अहमदनगर @ 382


माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर – जिल्ह्यात शुक्रवारी एकाच दिवशी तब्बल 28 करोनाबाधित आढळले आहेत. यापैकी 24 रुग्ण हे तोफखाना, सिद्धार्थनगर व नालेगाव या दाटवस्तीच्या भागातीलच आहेत. त्यामुळे नगर शहरातील दाटवस्तीमध्ये आता करोनाचा वेगाने फैलाव सुरू झाल्याचे स्पष्ट झाले असून नगकरांच्या चिंतेत भर पडली आहे. तीन दिवसांत जिल्ह्यातील करोना बाधितांच्या संख्येत अचानक मोठी झाली असून करोना पॉझिटिव्हचा आकडा आता 382 पर्यंत पोहचला असून ऑक्टिव्ह केसेसची संख्या 105 झाली आहे. यामुळे आरोग्य विभाग आणि जिल्हा प्रशासनाच्या अडचणी वाढल्या आहेत.

शुक्रवारी सकाळी 10 वाजेपर्यंत जिल्हा रुग्णालयाच्या करोना तपासणी प्रयोग शाळेत 285 करोना अहवालाची प्रतिक्षा होती. सकाळाच्या टप्प्यात यातील 70 करोना संशियतांचे अहवाल निगेटिव्ह आले. त्यानंतर सायंकाळी आलेल्या अहवालात जिल्ह्यात नव्याने 28 व्यक्तींना करोनाची बाधा झाल्याचे समोर आलं आहे

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post