देवाची कृपा, 43 वर्षे नॉट आऊट
माय अहमदनगर वेब टीम
मुंबई - 5 जून हा दिवस अभिनेते जॅकी श्रॉफ यांच्यासाठी दुहेरी सेलिब्रेशनचा असतो. या दिवशी त्यांची पत्नी आयशा श्रॉफचा वाढदिवस असतो आणि यासोबतच त्यांच्या लग्नाचाही वाढदिवस याच दिवशी असतो. जॅकी आणि आयशा यांच्या लग्नाला 33 वर्षे पूर्ण झाली आहेत.
यानिमित्ताने जॅकी यांनी त्यांच्या इंस्टाग्राम अकाऊटंवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. यात ते पत्नी आयशासोबत दिसत आहेत. व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये त्यांनी लिहिले, 'देवाची कृपा, 43 वर्षे नॉट आऊट.' खरं तर त्यांच्या लग्नाला 33 वर्षे पूर्ण झाली आहेत, पण त्यांचे नाते 43 वर्षे जुने आहे. त्यामुळे जॅकी यांनी कॅप्शनमध्ये 43 वर्षांचा उल्लेख केला आहे.
Post a Comment