नैसर्गिक ऑक्सिजनसाठी वृक्षलागवडीची गरज : डॉ. महेश वीर
माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर : मानवाचे आरोग्य सदृढ राहण्यासाठी मानवाला ऑक्सिजनची अत्यंत गरज असते. ऑक्सिजन हा आपल्याला नैसर्गिकरित्या झाडापासून मोफत मिळत असतो. मानवाला जीवनामध्ये ऑक्सिजनसाठी दोन झाडांची तरी गरज लागते. यासाठी मानवाने दोन झाडे लावून आपले शरीर निरोगी ठेवावे. नगरसेवक गणेश भोसले हे वृक्षांचा सांभाळ आपल्या मुलांप्रमाणे करीत असल्यामुळे या भागात मोठ्या प्रमाणात वृक्ष आहेत. वारकरी संतांनी सर्व जीवांमध्ये ईश्वर असल्याचे सांगितले. तसाच तो वृक्षावल्लीमध्ये देखील असल्याचा संदेश दिला. वृक्षवल्ली आम्हा सोयरी" असा संदेश जगतगुरु तुकोबा रायांनी आपल्याला अभंगातून दिला. पर्यावरणाने मानवी सृष्टीचे भविष्य सुरक्षित राहण्यासाठी ज्ञानोबा तुकाबांनी दिलेला विचार आजच्या काळातही तितकाच महत्त्वाचा ठरतो. तोच विचार नगरसेवक गणेश भोसले यांनी वृक्षांची लागवड व त्याचे संवर्धन करुन प्रत्यक्षात उतरवला आहे. आम्ही सर्व डॉक्टरांनी एकत्र येऊन पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी साईनगर परिसरात १0 ते १६ फूट उंचीचे १0०० झाडे लावण्याचा संकल्प केला आहे. तो आज आम्ही प्रत्यक्षात लावून पूर्ण केला. असे प्रतिपादन अस्थिरोग तज्ज्ञ डॉ. महेश वीर यांनी केले.
साईनगर परिसरात १00 झाडांचे वृक्षारोपन करताना डॉ. महेश वीर, डॉ. अखिलेश धानोरकर, डॉ. सुप्रिया वीर, डॉ. बाळासाहेब देवकर, डॉ. निलोफर धानोरकर, डॉ. सुदाम जरे, डॉ.रामदास बांगर. यावेळी नगरसेवक गणेश भोसले, प्रकाश भागानगरे, संजय चोपडा, रवी शेलोत व साईनगरमधील नागरिक उपस्थित होते.
यावेळी गणेश भोसले म्हणाले की, वृक्ष लागवड व त्याचे संवर्धन करण्याचे काम गेल्या २0 वर्षांपासून करीत आहे. प्रत्येक वर्षी १0०0 झाडे लावून ते जगविण्याचे काम केले जाते. झाडे हे मानवी जीवनातील एक महत्त्वाचा घटक आहे. झाडांमुळे आरोग्यबरोबरच त्या परिसराला सुंदरता प्राप्त होते. शासनाने वृक्षांची लागवड करीत असताना विविध संस्थांना व नागरिकांना सोबत घेऊन काम केले पाहिजे. कोरोना विषाणुच्या संसर्गामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण आहे. त्यामुळे हा वृक्षारोपनाचा कार्यक्रम नागरिकांची काळजी घेऊन सोशल डिस्टन्सिंगचा नियम पाळून पार पाडल्याचे ते म्हणाले.
डॉ. बाळासाहेब दरेकर म्हणाले की, वृक्षलागवड ही फोटोसेशन पुरते मर्यादित न राहता वृक्षांचे संवर्धन होणे ही काळाची गरज आहे. नगरसेवक गणेश भोसले शहरामध्ये वृक्ष लावून ते जगवण्याचे काम जबाबदारीने करत असल्यामुळे आम्ही सर्व डॉक्टर एकत्र येऊन नगरसेवक गणेश भोसले यांच्या वॉर्डात वृक्ष लागवडीचा निर्णय घेतला असल्याचे ते म्हणाले.
Post a Comment