कोरोना पारनेर, नगर, संगमनेरकरांचा पिच्छा सोडेना
माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर - *संगमनेर तालुक्यातील ०३ तर पारनेर तालुक्यातील दोन आणि नगर शहरातील एका जनाला कोरोनाची लागण झाली आहे.
*संगमनेर शहरातील नाईकवाडपुरा या प्रतिबंधित क्षेत्रात आज ५९ वर्षीय व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आला. तसेच घुलेवाडी येथील ४८ वर्षीय पुरुष आणि जोर्वे येथील ४५ वर्षीय पुरुषालाही कोरोनाची बाधा. आजाराची लक्षणे जाणवू लागल्याने उपचारासाठी झाले होते दाखल.
*पारनेर तालुक्यातील भाळवणी येथील एकाच कुटुंबातील दोन मुलींना कोरोनाची लागण. यापूर्वीच्या बाधित झालेल्या व्यक्तीच्या संपर्कामुळे झाली लागण.
*मूळचा झारखंड येथील असलेला आणि नगर शहरातील सारसनगर येथे राहणाऱ्या ५८ वर्षीय व्यक्तिलाही कोरोनाची लागण. कर्करोगावरील उपचारासाठी मुंबई येथे प्रवास करून आला होता.
*जिल्ह्यातील एकूण नोंद रुग्ण संख्या: २८२*
*कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांची संख्या आता २३७*
Post a Comment