अमृत पाणी योजनेच्या समन्वयक पदी नगरसेवक मनोज कोतकर यांची निवड
माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर- नगर शहराला पाणी पुरवठा करणारी पाणी योजनेला अनेक वर्ष झाल्यामुळे पूर्ण दाबाने पाणी पुरवठा होत नसल्यामुळे मा.केंद्र शासनाने अमृत योजने अंतर्गत शहर पाणी पुरवठा योजना मंजूर केली आहे. या योजनेचे काम सुरू झाले आहे. मुळा डॅम ते विळद पंपींग स्टेशन ते वसंत टेकडी सुमारे 14किमी पैकी 12 किमी चे काम पूर्ण झाले आहे. काही ठिकाणी पाईप लाईन टाकूण झाली आहे. शेतक-यांच्या शेतामधून ही योजना जात आहे. त्यामुळे पाईप लाईन टाकण्यास अडथळे निर्माण झाले आहे. सदर काम लवकरात लवकर पूर्ण होण्याच्या दृष्टिने नगरसेवक मा.श्री.मनोज कोतकर यांची अमृत पाणी योजनेच्या समन्वयक पदी निवड करण्यात आली आहे. श्री कोतकर हे अधिकारी, ठेकेदार व शेतकरी यांच्यात समन्वय घडवून अमृत पाणी पुरवठा योजना लवकरात लवकर पूर्ण करून नगर शहराला पूर्ण दाबाने पाणी पुरवठा केला जाणार आहे. याकामासाठी श्री कोतकर यांना नगरसेवक मा.श्री.कुमार वाकळे, मा.श्री.रविंद्र बारस्कर, माजी नगरसेवक मा.श्री.निखील वारे, मा.श्री.उदय कराळे हे सहकार्य करणार आहेत. सदर बाबत ठेकेदार संस्थेचे प्रतिनिधी, एमजीपी संबंधीत मनपा अभियंता यांचेशी संपर्क साधून पाईप लाईन अथरण्याच्या कामात येणा-या अडचणी बाबत चर्चा करून काम लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या दृष्टिने कार्यवाही करणार आहेत अशी माहिती मा.महापौर श्री.बाबासाहेब वाकळे यांनी दिली आहे.
Post a Comment