मंदिरे उघडण्यास परवानगी द्या ; अन्यथा मंदिरांमध्ये होमहवन आंदोलन


माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर - दीनदयाळ परिवाराच्या वतीने राज्य सरकारकडे या पूर्वी पत्रव्यवहार करून राज्यातील मंदिरे उघडण्यात यावी अशी विनंती केली होती. मात्र सरकारने अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही. दि. ३० मे रोजी केंद्र सरकारने लॉकडाऊनचे नियम काही प्रमाणात शिथिल करून देशातील मंदिरे व धार्मिक स्थळे अटींवर सुरु करण्यास मान्यता दिली आहे. त्यानुसार काही राज्यांमध्ये मंदिरे व धार्मिक स्थळे उघडण्यात आली आहेत. केंद्रातील मोदी सरकार धार्मिक स्थळे उघडण्याचा निर्णय घेते मात्र राज्यसरकार त्यास रेड सिग्नल देते हे काही बरोबर नाही. मुख्यमंत्री स्वत: हिंदुत्वाचे पुरस्कर्ते असतांना राज्यात मंदिरांना टाळे आहे. त्यामुळे राज्य सरकारने मंदिरांबाबतचा निर्णय त्वरित बदलावा अन्यथा दीनदयाळ परिवार आंदोलनात्मक पाऊले उचलून ठीकठिकाणी मंदिरांमध्ये होमहवन आंदोलन सुरु करेल, असा इशारा दीनदयाळ परिवाराच्या वतीने वसंत लोढा यांनी राज्य सरकारला दिला आहे.

नगरच्या दीनदयाळ परिवाराच्या वतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना ईमेल द्वारे निवेदन पाठवून राज्यातील मंदिरे व इतर धार्मिक स्थळे सुरु करण्याची मागणी केली आहे. निवेदनात म्हंटले आहे कि, राज्य सरकारने दि. ३१ मे रोजी लॉकडाऊनचे नियम शिथिल केले आहेत. मात्र इतर सुविधांप्रमाणे मंदिरे व इतर धार्मिक स्थळे उघडण्यास परवांगी दिलेली नाही. तरी पंडित दीनदयाळ परिवाराच्या वतीन विनंती आहे की सामाजिक अंतराचे व स्वच्छतेचे कडक नियम करून मंदिरे व धार्मिक स्थळे सुरु करावीत. करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जे या सर्व नियमांची तंतोतंत अंमलबावणी करतील अशाच मंदिरांना व धार्मिक स्थळांना परवांगी द्यावी.

दीनदयाळ परिवाराच्या या मागणीचा राज्य सरकाने सहनुभूतेने विचार करून त्वरित निर्णय घ्यावा. अन्यथा नाईलाजाने दीनदयाळ परिवार आंदोलनाचा मार्ग स्वीकारुन ठीकठिकाणच्या मंदिरांमध्ये होमहावन आंदोलन सुरु करेल.

निवेदनावर वसंत लोढा यांच्या सह बापू ठाणगे, प्रा. सुनील पंडित, सुहासभाई मुळे, भैय्या गंधे, प्रा.मधुसूदन मुळे, बाळासाहेब भुजबळ, अनिल शर्मा, हरिभाऊ डोळसे, गौतम कराळे, बाळासाहेब खताडे, सदाभाऊ शिंदे, सोमनाथ चिंतामणी, सचिन पारखी आदी सदस्यांच्या सह्या आहेत.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post