माय अहमदनगर वेब टीम
उत्पन्नाचे साधन बनल्यास कर: वारशाने किंवा मृत्युपत्राच्या माध्यमातून मिळालेली रक्कम आपण गुंतवणूक करुन त्यापासून उत्पन्न मिळवत असाल किंवा मालमत्ता विकून उत्पन्न किंवा व्याज मिळवत असाल तर त्यावर आपल्याला कर भरावा लागेल.
मालमत्ता विक्री केल्यास भांडवली नङ्गा कर: मालमत्तेवर आकारला जाणारा भांडवली नङ्गा हा कालावधीवर अवलंबून आहे. वारशाने मिळालेल्या मालमत्तेच्या प्रकरणात त्याचा होल्डिंग पीरियड हा वास्तविकपणे मालकाकडून मालमत्ता खरेदी केल्याच्या तारखेपासून गृहित धरले जाते. मालमत्ता हस्तांतरित केल्यापासून नाही. जर मालमत्ता दोन वर्षापेक्षा अधिक काळ असेल आणि त्यानंतर विकली जात असेल तर त्यापासून मिळणार्या उत्पन्नाला लॉंग टर्म कॅपिटल गेन म्हणून गृहित धरले जाईल. जर दोन वर्षापेक्षा कमी काळ असेल तर त्यास शॉर्ट टर्म कॅपिटल गेनमध्ये सामील केले जाईल. या आधारावर प्राप्तीकर खात्याकडून कर निश्चित केला जातो.
करसवलत अशी मिळवा: 2019 चा अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वी निवासी घर विकून दुसरे घर खरेदी केल्यास कॅपिटल गेन्सवर टॅक्स डिडक्शन मिळत होता. अर्थात त्या पैशातून घर खरेदी करणे अपेक्षित आहे. मात्र 2019 च्या हंगामी अर्थसंकल्पात यात बदल झाला आणि एक घर विक्रीतून मिळालेल्या पैशातून दोन घर खरेदी केल्यास भांडवली नप्यावर टॅक्स डिडक्शनचा लाभ दिला गेला. मात्र कॅपिटल गेन्स दोन कोटीपेक्षा अधिक असणार नाही, ही अट घातली गेली.जर दोन कोटीपेक्षा अधिक किंमत असेल तर करसवलतीचा लाभ केवळ एकाच घराला दिला जाईल. याशिवाय अन्य एक अट म्हणजे मालमत्ता विक्रीतून मिळणार्या पैशांवर टॅक्स डिडक्शनचा लाभ घेण्यासाठी एक निश्चित कालावधीत दुसरे घर खरेदी करणे अपेक्षित आहे.
उदा. पहिल्या घराच्या विक्रीच्या तारखेपासून दोन वर्षाच्या आत आणि दुसर्या घराच्या बाबतीत बांधकामाच्या तीन वर्षाच्या आत. एवढेच नाही तर कॅपिटल गेन्ससंदर्भात प्राप्तीकर कायद्याच्या सेक्शन 54 इसीनुसार कॅपिटल गेन्स बॉंडमध्ये गुंतवणूक करुन करसवलतीचा दावा करु शकतो. या बॉंडची गुंतवणुकीची मर्यादा 50 लाख रुपयांपर्यंत आहे.
Post a Comment