थ्रीडी तंत्रज्ञानाची अशीही कमाल
माय अहमदनगर वेब टीम
दक्षिण आफ्रीकेतील संशोदकांनी थ्रीडी प्रिंटिंगच्या सहाय्याने 35 वर्षे वयाच्या एका व्यक्तीच्या कानाची तुटलेली सर्व हाडे जोडली आणि कानाचा पडदाही ठीक केला. त्यामुळे आता ही व्यक्ती पुन्हा एकदा ऐकू शकते. एका कार अपघातात या व्यक्तीचा कान नष्ट झाला होता. प्रिटोरिया विद्यापीठातील संशोधक मशुदु सिफुलारो यांनी याबाबतची माहिती दिली. ते म्हणाले, थ्रीडी प्रिंटिंगच्या सहाय्याने अशा प्रकारचा उपचार जगात प्रथमच करण्यात आला आहे.
सिफुलारो आणि संशोधकांच्या एका थ्रीडी प्रिंटिंग तंत्राने ही यशस्वी शस्त्रक्रिया केली. या टीमने प्रिंटरच्या सहाय्याने जखमी माणसाच्या जखमी माणसाच्या कानाच्या तुटलेल्या भागांचे स्कॅनिंग केले. त्यानंतर एक प्रयोग करून तुटलेली हाडे आणि ऊतींचे पुनर्निर्माण सुरू केले. त्यानंतर या व्यक्तीला पुन्हा एकदा कानालाच लाभ झाला. या तंत्राने शरीरातील सर्वात छोट्या हाडालाही स्कॅन करून त्याचा वास्तविक आकार मिळवता येतो. याच तंत्राने कानामधील काही अतिशय छोट्या आकाराच्या हाडांचीही अचूकपणे पुन्हा निर्मिती करता येणे शक्य झाले भविष्यात श्रवणक्षमता आणि कानाबाबतच्या अनेक समस्या अशा तंत्राच्या सहाय्याने सोडवता येऊ शकतील असे संशोधकांनी म्हटले आहे.
Post a Comment