सायकलिंग असोसिएशनच्या नवीन लोगोचे अनावरण
माय अहमदनगर वेब टीम
पुणे- जागतिक ऑलंपिक दिनाचे औचित्त साधून सायकलिंग असोशिएशन ऑफ महाराष्ट्र (cam) नवीन लोगोचे अनावरण महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री व महाराष्ट्र ऑलंपिक असोसिएशनचे अध्यक्ष अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले. पुणे येथे झालेल्या छोट्याखानी कार्यक्रमात सायकलिंग असोसिएशनच्या नवीन लोगोचे अनावरण करण्यात आले. आणि सायकलिंग असोसिएशन ऑफ महाराष्ट्र या संघटनेला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी प्रसिद्ध उद्योगपती आणि एमआयटी विश्वशांती विद्यापीठ सीआयपीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सीईओ प्रवीण पाटील, सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडियाचे खजिनदार प्रताप जाधव, कोल्हापूर जिल्हा सायकलिंग असोशिएशन उपाध्यक्ष अभिजित मोहिते, सदस्य भूषण जाधव आदी उपस्थित होते.
जलद आणि आधुनिकतेची सांगड घालताना अॅड. एम. क्रिएशनचे विकास भागवत यांनी लोगोची निर्मिती केली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सायकलिंग असोशिएशन ऑफ महाराष्ट्रच्या गत तीन वर्षाच्या कामाचे कौतुक केले. महाराष्ट्रातील सायकलपट्टूच्या कामगिरीत सुधारणा झाल्याचे त्यांनी नमूद केले. सायकलिंग खेळास आगामी काळात सर्वोतोपरी सहकार्य करणार असल्याचे श्री.पवार यांनी सांगितले.
Post a Comment