अहमदनगर – करोना संसर्गामुळे जगाची प्रगती आणि हतबलता समोर आली आहे.करोना संसर्गात जिल्ह्यातील शाळा सुरू कराव्यात की नाही. ऑनलाईन शिक्षण देता येईल का याची चाचपणी करण्यात आली. यात जिल्ह्यात 1 लाख 5 हजार विद्यार्थ्यांकडे ऑनलाईन शिक्षणासाठी बेसिक गरजेची असणारी रेडिओ, टिव्ही अथवा स्मार्ट फोनच नाहीत. यामुळे या विद्यार्थ्यांना कसे ऑनलाईन शिक्षण मिळणार? हा प्रश्न आहे.
राज्य सरकारच्या शालेय शिक्षण विभागाने गेल्या आठवड्यात जिल्ह्यातील प्रत्येक शाळा व्यवस्थापन समितीने करोना संसर्गात शाळा सुरू कराव्यात का, ऑनलाईन शिक्षण पध्दती अवलंबवावी, यासाठी ऑनलाईन साधनांची बेसिक माहिती संकलित केली. यात जिल्ह्यात असणार्या पहिले ते बारावीपर्यंत 9 लाख 11 हजार विद्यार्थ्यांपैेकी 5 लाख 36 हजार विद्यार्थ्यांकडे टीव्ही आणि 3 लाख 56 हजार विद्यार्थ्यांकडे रेडिओ हे ऑनलाईन अथवा द्रवक संपर्काचे साधन उपलब्ध आहे.
तर 1 लाख 5 हजार विद्यार्थ्यांकडे यापैकी काहीच नाही. यामुळे या विद्यार्थ्यांना शाळेत जावून शिक्षण घेण्याशिवाय पर्याय राहत नाही. करोना संसर्ग कमी होईल, पुन्हा शाळा सुरू देखील होतील. मात्र, ऑनलाईनच्या जमान्यात जिल्ह्यातील हे 1 लाख विद्यार्थी हे ऑनलाईनच्या बेसिक साधनापासून लांब असल्याचे करोनाने दाखवून दिले आहे. यामुळे किमान पहिले ते दहावीच्या शिक्षणासाठी सरकार, जिल्हा परिषद आणि खासगी शाळा व्यवस्थापनाला याचा गंभीरपणे विचार करून भविष्यात करोनापेक्षा समोर येणार्या गंभीर समस्यांच्यावेळी शिक्षणाची अडचण होवू नयेत, यासाठी आतापासून तयारी करणे गरजे आहे.
करोनामुळे आपल्याकडे असणार्या साधन सामुग्रीच्या उणिवा समोर आल्या आहेत. जिल्ह्यात तीन तालुक्यात जवळपास 63 विद्यार्थी ऑनलाईन बेसिक साहित्यापासून दूर आहेत. यात सर्वाधिक अकोले तालुक्यात 41 हजार 856, नेवासा आणि राहुरी तालुक्यात प्रत्येकी 11 हजार विद्यार्थ्याचा यात समावेश आहे.
अकाले 41 हजार 856, जामखेड 636, कोपरगाव 4 हजार 80, कर्जत 7 हजार 616, नगर 1 हजार 206, नेवासा 11 हजार 9, पारनेर 1 हजार 529, पाथर्डी 271, राहुरी 11 हजार 506, राहाता 3 हजार 419, शेवगाव 5 हजार 187, संगमनेर 8 हजार 184, श्रीगोंदा 6 हजार 986, श्रीरामपूर 915, महापालिका 1 हजार 263 असे आहेत.
सामुहिक रेडिओ सेंटरसोबत
मोफत पाठ्यपुस्तके द्या- कुलकर्णी
जिल्ह्यात अकोले, राहुरी आणि नेवासा तालुक्यात आदिवसी लोकसंख्येच प्रमाण अधिक आहे. या ठिकाणी ऑनलाईन शिक्षण शक्य नाही. यामुळे या ठिकाणी सरकारने सामुहिक रेडिओ सेंटर सुरू करणे आवश्यक आहे. यासह जिल्हा परिषदेने पूर्वीप्रमाणे स्वाध्याय पुस्तिका तयार करून मोफत पाठ्यपुस्तकांसोबत ते विद्यार्थ्यांना उपलब्ध करून द्यावेत. राज्यात इयत्ता नववी पासून शाळा गळतीचे प्रमाण अधिक असल्याचे आकडेवारी सांगते. जिल्हा परिषद सदस्य राजेश परजणे यांची मोफत पाठ्य प ुस्तकाची मागणी योग्यच आहे. करोनामुळे सामान्य आणि गरिबांचे आर्थिक गणित कोलमडले असून शाळा गळती रोखण्यासाठी मोफत पाठ्यपुस्तके आणि गणवेश देणे गरजेचे आहे.
हेरंब कुलकर्णी, शिक्षण तज्ज्ञ, अकोले.
Post a Comment