शरद पवारांच्या ताफ्यातील पोलीस वाहनाला अपघात



माय अहमदनगर वेब टीम
पिंपरी चिंचवड- राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या ताफ्यातील पोलिसांच्या वाहनाला पिंपरी चिंचवडमध्ये अपघात झाला. या अपघातात पोलीस कर्मचारी किरकोळ जखमी झाला आहे. तर शरद पवार सुखरुप असून ते मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत.

द्रुतगती मार्गावरुन पुण्याहून मुंबईला जाताना आज (29 जून) सकाळी सव्वा दहाच्या सुमारास ही घटना घडली. अमृतांजन पुलाजवळ शरद पवारांच्या ताफ्यातील पोलिसांची गाडी घसरल्याने उलटी झाली. सुदैवाने या अपघातात कोणीही गंभीर जखमी झालेलं नाही. गाडीतील पोलीस कर्मचारी मात्र किरकोळ जखमी झाला आहे.

अपघात झाला त्यावेळी शरद पवारांची गाडी पुढे होती. त्यामुळे त्यांच्या गाडीला धक्का न लागल्याने सुरक्षित आहे. स्थानिक पोलिसांनी अपघातग्रस्त वाहन बाजूला करुन पवारांचा ताफा मुंबईच्या दिशेने रवाना केला.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post