म्हणून केला जॉगिंग ट्रॅक बंद...!
माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर – नगर शहरातील कोरोना बाधित रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे भुईकोट किल्ला परिसरातील जॉगिंग ट्रॅक पुन्हा बंद करण्यात आला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून हा जॉगिंग ट्रॅक बंद करण्यात येत असल्याचा फलक या ठिकाणी लावण्यात आला आहे.
किल्ला परिसरात दररोज फिरायला व व्यायाम करायला येणार्यांची संख्या लक्षणीय आहे. यावेळी कुठलेही सोशल डिस्टन्सिंग पाळले जात नाही. त्याचप्रमाणे सार्वजनिक ठिकाणे एकत्र येत असताना तोंडाला मास्क लावणे अनिवार्य आहे. त्याचेही पालन केले जात नाही. कोरोनाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता लक्षात घेऊन हा ट्रॅक बंद करण्यात आला आहे. नगरकरांनीही या भागात गर्दी करू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.
Post a Comment