राज्यात उद्या मान्सूनचे आगमन होणार ??


माय अहमदनगर वेब टीम
पुणे  – केरळमध्ये दाखल झालेल्या मान्सूनचे आगमन महाराष्ट्रात कधी होणार याची प्रतिक्षा संपली असून उद्या (दि. 10 जून) रोजी मान्सूनचे राज्यात आगमन होईल असा अंदाज भारतीय हवामान विभागाने दिला आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला असून त्यामुळे मान्सून सक्रीय झाला आहे. रत्नागिरी, सिधुदुर्ग आणि गोव्यामध्ये त्याचे 10 जूनला आगमन होईल आणि पावसाला सुरुवात होईल अशी माहिती पुणे वेधशाळेच्या हवामान विभागाचे प्रमुख डॉक्टर अनुपम काश्यपी यांनी दिली. 11 तारखेला मान्सूनचा वेग अधिक वाढणार असून पुढील पाच दिवसांमध्ये संपूर्ण राज्य व्यापून टाकेल,असा हवामान विभागाचा अंदाज आहे.
राज्याच्या अनेक भागात पूर्व मान्सून पाऊस पडलाय. त्याचबरोबर चक्रीवादळही येऊन गेलंय. त्यामुळं आता सर्वांच्या नजरा या मान्सूनच्या आगमनाकडे लागल्या आहेत. मात्र आता ही प्रतीक्षा दहा तारखेला संपणार आहे.

मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल. मध्य महाराष्ट्रात अकरा तारखेला 11 ते 13 तारखेला हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल. काही ठिकाणी घाटमाथ्यावर अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलेला आहे. नाशिक आणि पुण्याच्या परिसरामध्ये अतिवृष्टीचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

मराठवाड्यात आणि विदर्भात अकरा तारखेपासून पावसाला सुरुवात होईल. पुढील दोन दिवस काही ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. राज्यामध्ये दहा तारखेला मान्सूनचे आगमन होईल आणि पुढील पाच दिवसांमध्ये संपूर्ण राज्य व्यापून टाकेल,असा हवामान विभागाचा अंदाज आहे. 12 तारखेला पुण्यात आणि 13 तारखेला मुंबईत मान्सून बसणार आहे.

अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात मान्सूनला पोषक वातावरण आहे. त्यामुळं राज्यात अकरा तारखेपासून मान्सूनचा जोरात वेग वाढेल. कोकण, विदर्भ मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा तर काही ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

कोकण गोव्यात अकरा तारखेपासून पुढील पाच दिवस सर्वदूर पाऊस पडेल. अकरा तारखेला काही ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलाय. तर पुढील दोन दिवस जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post