मास्क न लावणार्या विरोधात पोलिसांनी केली ही कारवाई
माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठेत गर्दीच्या ठिकाणी मास्क न लावता फिरणार्या अक्षय दत्तात्रय राऊत (वय-25, रा. नेहरू मार्केट जवळ), सागर शिवलिंग मेमाणे (वय-25, रा. परदेशी गल्ली) यांच्या विरूध्द कोतवाली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई रविवारी (दि.14) सायंकाळी कापड बाजार येथे करण्यात आली.
या प्रकरणी पोलिस कॉन्स्टेबल निलेश भालसिंग यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कोतवाली पोलिसांनी भारतीय दंड विधान कायदा कलम 188, 262 प्रमाणे गुन्ह्याची नोंद केली आहे. पुढील कारवाई पोलिस नाईक मेटे व पोलिस नाईक धोत्रे हे करीत आहेत.
Post a Comment