संत तुकाराम महाराज पालखीचे मोजक्या वारकर्यांच्या उपस्थितीत पंढरपूरकडे प्रस्थान
माय अहमदनगर वेब टीम
पुणे – ना टाळ – मृदंगाचा निनाद… ना दिंड्या पताकांची फडफड…ना वैष्णवांचा मेळा…तरीही सर्वत्र भरून राहिलेला विठ्ठलभक्तीचा जागर…अशा विठ्ठलमय वातावरणात संत तुकाराम महाराजांच्या पादुका परंपरेप्रमाणे विठुरायाच्या भेटीकरिता शुक्रवारी (दि.12) दुपारी सव्वातीनच्या सुमारास पंढरपूरकडे निघाल्या. एरवी वारकर्यांच्या मांदियाळीने ओसंडून वाहणाछया देऊळवाड्यात कोरोनामुळे अवघे 20 वारकरीच एकवटले असले, तरी त्यांच्या मुखातून ज्ञानोबा – तुकोबाचा गजर होताच सारा आसमंतच लाखमोलाचा बनला.
राज्यात कोरोना महामारीने थैमान घातले आहे. त्यामुळे यंदाची आषाढी पायी वारी सोहळा रद्द करण्याचा निणछय राज्य सरकारने घेतला आहे. गेल्या अनेक वर्षांची परंपरा अबाधित मेवण्यासाफी 50वारकछयांच्या उपस्थितीत संतांच्या पादुका विठ्ठलाच्या दर्शनाला नेण्याचा निणछय घेण्यात आला आहे. त्यानुसार संत तुकाराम महाराज संस्थानने 50 वारकछयांच्या उपस्थितीत 335 व्या प्रस्थान सोहळ्याचे नियोजन केले. पालखी प्रस्थान सोहळ्याचे पारंपरिक कार्यक्रम पहाटे चारपासून सुरू झाले. पाच वाजता देऊळवाड्यातील संत तुकाराम महाराज शिळा मंदिरात पालखी सोहळा प्रमुख माणिक महाराज मोरे, विशाल महाराज मोरे, संतोष महाराज मोरे, संस्थानचे अध्यक्ष मधुकर महाराज मोरे, विश्वस्त संजय महाराज मोरे, अजित महाराज मोरे, काशिनाथ महाराज मोरे यांच्या हस्ते महापूजा झाली. पालखी सोहळ्याचे जनक तपोनिधी नारायण महाराज यांच्या समाधी मंदिरातील महापूजा संस्थानचे अध्यक्ष मधूकर महाराज मोरे, विश्वस्त अजित मोरे यांच्या हस्ते झाली. देऊळवाड्यातील भजनी मंडपात सकाळी दहा वाजता पुंडलिक महाराज देहूकर यांच्या पादुका प्रस्थान सोहळ्यानिमित्ताने कीर्तन झाले.
तुझिया संगती । झाली आमची निश्चिंती ।्। या अभंगावर त्यांनी निरुपण केले.
श्री. विठ्ठल रुक्मिणी मंदिरात संत तुकाराम महाराजांच्या पादुकांची पूजा करण्यात आली. मानकरी म्हसलेकर दिंडी यांनी संबळ, टाळ मृदंग गजर आणि तुताछया वाद्यांसह मुख्य मंदिरातील भजनी मंडपात पालखी वाजतगाजत आणली. दुपारी पावणेतीनच्या सुमारास पालखी प्रस्थान सोहळ्यास सुरुवात झाली. देऊळवाड्यातील भजनी मंडपात संत तुकाराम महाराज पादुका आणि माऊलींच्या पादुकांची विक्रम महाराज माळवे, शिवसेना खासदार श्रीरंग बारणे, मावळचे आमदार सुनील शेळके यांच्या हस्ते महापूजा झाली. पुजारी नारायण अत्रे यांनी पौराहित्य केले. संस्थानचे अध्यक्ष मधुकर महाराज मोरे, पालखी सोहळा प्रमुख माणिक महाराज मोरे, विशाल महाराज मोरे, संतोष महाराज मोरे, विश्वस्त अजित महाराज मोरे, काशिनाथ महाराज मोरे, संजय महाराज मोरे, संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे प्रमुख विश्वस्त अॅड. विकास ढगे आदी उपस्थित होते.
पादुका पुजनानंतर फडकरी, मानकरी, दिंडीप्रमुख यांचा संस्थानतर्फे सत्कार करण्यात आला. त्यानंतर पुंडलिक वरदा हरी विठ्ठल चा जयघोष करीत पादुकांचे प्रस्थान झाले. देऊळवाड्यातील मंदिर प्रदिक्षणा झाली. वारकछयांनी टाळ मृदंगाचा गजर आणि ज्ञानोबा तुकारामचा जयघोष केला. खांद्यावर गरुडटक्के, चोपदार होते. देऊळवाड्यातील प्रदक्षिणा पूर्ण केल्यानंतर पादुका पुन्हा मंदिरात विराजमान करण्यात आल्या. 12 ते 29 जूनपर्यंत वारीच्या वाटेवर दररोज परंपरेनुसार होणारे धार्मिक कार्यक्रम साध्या पध्दतीने मुख्य देऊळवाड्यात होणार आहेत. या कालावधीत देऊळवाड्यात मोजक्या नागरिकांना प्रवेश देण्यात येणार आहे. 30 जूनला देऊळवाड्यातून श्री. संत तुकाराम महाराजांच्या पादुका पंढरपूरला नेण्यात येणार आहेत.
Post a Comment