पत्नीला ताप आल्यामुळे पतीला आला कोरोनाचा संशय, त्याने केले हे कृत्य
माय अहमदनगर वेब टीम
सोलापूर - सोलापूरमधून एक विचित्र घटना समोर आली आहे. येथील एका महिलेला ताप आल्यानंतर पतीने तिला हॉस्पीटलमध्ये दाखल केले, त्यानंतर तिला कोरोना झाल्याची संश आल्यामुळे स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केली. घटना बुधवारी घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, घटना सोलापूरच्या न्यू बुधवार पेठ परिसरातील आहे. येथील रहिवासी शारदाबाई कस्बे यांना ताप आल्यानंतर दोन दिवसांपूर्वी पती अभिमन्यु कस्बेने सरकारी हॉस्पीटलमध्ये भर्ती केले होते. दोन दिवसानंतरही पत्नीची तब्येत ठीक न झाल्यामुळे पतीन तनावात आले. त्यांनी हॉस्पीटलमध्ये जाऊन पत्नीला भेटण्याचा प्रयत्न केला, पण नियमांमुळे त्यांना भेटू दिले नाही. त्यानंतर अभिमन्यु यांना पत्नीला कोरोना झाल्याचा संशय आला. त्यानंतर घरी येऊन त्यांनी गळफास घेऊन आपले जीवन संपवले.
जिवंत असताना ज्या रुग्णालयात जाता आले नाही, तिथे मृत्यूनंतर गेले
या घटनेतील दुःखद बाब म्हणजे, ज्या सरकारी हॉस्पीटलमध्ये जिवंत असताना अभिमन्यु यांना जाऊन दिले नाही. त्याच हॉस्पीटलमध्ये त्यांचा मृतदेह नेण्यात आला. सोलापूरमधून बुधवारी 49 कोरोना संक्रमित सापडले आहेत. यासोबतच एकूण संख्या 1310 झाली आहे. यातील 429 अॅक्टिव रुग्ण असून, 122 कोरोना संक्रमितांचा मृत्यू झाला आहे.
Post a Comment