शाळा विद्यार्थ्यांना देणार ऑनलाईन शिक्षण
माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर- जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज या संस्थेच्या जिल्ह्यातील 50 शाळांमध्ये इयत्ता पाचवी ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण देण्याचा निर्णय संस्थेच्या व्यवस्थापनाने घेतला आहे, अशी माहिती संस्थेचे सचिव जी. डी. खानदेशे यांनी दिली.
श्री. खानदेशे म्हणाले की, ऑनलाईन शिक्षण पध्दतीची संस्थेची शिक्षकांकडून प्रभावी व दर्जेदार अंमलबजावणी करण्यासाठी संस्थेतर्फे शिक्षकांसाठी तीन दिवसांची न्यू आर्टस, कॉमर्स अॅण्ड सायन्स महाविद्यालयात प्राचार्य डॉ. बी. एच. झावरे यांच्या मार्गदर्शनाखाली बीसीए विभाग प्रमुख प्रा. अरुण गांगर्डे यांनी कार्यशाळा घेण्यात आली. यामध्ये सुमारे 100 शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात आले. या कार्यशाळेचे नियोजन केले आहे. कार्यशाळेमध्ये संस्थेतील शिक्षकांनी स्वतःचे ई-कंटेंट तयार करून ते डिजीटल पध्दतीने विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक तांत्रिक पध्दतीची माहिती देण्यात आली.
Post a Comment