नाडी शोधन प्राणायम
माय अहमदनगर वेब टीम
हेल्थ डेस्क - शरीर व मनाच्या शुद्धीचे साधन म्हणजे “प्राणायाम’ प्राणाचा आयाम करणे म्हणजेच श्वास लांबविण्याची क्रिया. जास्तीतजास्त श्वास … पण आपल्या दैनंदिन जीवनातही प्राणायामाचे महत्व अनन्यसाधारण आहे.प्राणायाम ही अष्टांगयोगातील चौथी पायरी आहे. प्राणाचे वीविध अवयवातील प्रमाण असंतुलित झाल्याने शरीरात रोग उत्पन्न होतात. प्राणायामामुळे प्राण शक्ती संतुलित होऊन रोगांचा नाश होतो … श्वासोच्छवासाच्या नियमनाने प्राणायाम साधता येतो.
नाडी शोधन प्राणायामात डाव्या व उजव्या नासिकेने आलटुन पालटुन श्वास घेतल्याने डाव्या व उजव्या मेंदूच्या कार्यात समतोल राखणे शक्य होते. ज्याचा आपल्या व्यक्तिमत्वातील तर्कशुद्ध तसेच भावनिक बाजुंशी संबध आहे.हा प्राणायामातील एक असा प्रकार आहे ज्यामुळे श्वसनमार्ग मोकळा होतो व रक्ताभिसरण सुधारते.या प्राणायामुळे शरिरातील ऑक्सिजन व कार्बनडायऑक्सईडचे प्रमाण सुधारते. त्यामुळे अशुद्ध रक्ताचा निचरा होऊन शरीराला शुद्ध रक्ताचा पुरवठा होतो.तसेच शरिरातील तापमानात समतोल राखण्यास मदत होते.
Post a Comment