नेवासा– नेवासा तालुक्यातील वडाळा बहिरोबा येथे आज पहाटे ४ वाजेच्या सुमारास नगर-औरंगाबाद महामार्गावर सीपीएफ कंपनीसमोर औरंगाबादहुन अहमदनगरकडे जाणारा कंटेनर डिव्हायडर पार करून नगरहुन औरंगाबाद कडे येणाऱ्या मालवाहतूक ट्रकवर समोरू धडकली.
त्या रस्त्यावर काही काळ वाहतूक विस्कळीत होऊन वाहतूक कोंडी निर्माण झाली होती या अपघातात कंटेनर व मालट्रचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून दोन्ही चालक जखमी झाले आहेत. शनिशिंगणापूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन वाहतूक सुरळीत केली आहे. रतन शंकर देवरे यानी दिलेल्या फिर्यादीवरून अपघाताचा गुन्हा दाखल केला आहे.
Post a Comment