महाविकासआघाडी मध्ये “धुसफूस” ?
माय अहमदनगर वेब टीम
मुंबई – काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाणांनंतर ठाकरे सरकारमधील काँग्रेसचे मंत्री नितीन राऊत यांनी एका वृत्त वाहिनिशी बोलताना सरकारच्या निर्णप्रक्रियेबद्दल नाराजी व्यक्त केली आहे.
ते बोलतांना म्हणाले, “राज्य सरकारच्या निर्णय प्रक्रियेत काँग्रेसला स्थान नाही. काँग्रेसच्या बऱ्याच मंत्र्यांचा हा अनुभव आहे. याबाबत मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन नाराजी कळवणार आहे. काँग्रेसच्या काही आमदारांचीही नाराजी आहे”
आज या नाराजी नाट्य वरून काँग्रेसचे नेते मुख्यमंत्र्यांची भेट घेणार होते, पण काही कारणास्तव ही भेट स्थगित करण्यात आली आहे. करोनाच्या संकट काळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काँग्रेस नेत्यांची नाराजी कशी दूर करता हे पाहणे औचित्याचे ठरेल.
Post a Comment