ब्रिटन : ३४ अंशांमुळे त्रस्त, किनाऱ्यावर गर्दी... युरोपात उष्णतेमुळे वैताग
माय अहमदनगर वेब टीम
लंडन - युरोपीय देश कोरोनामधून मुक्तही झाले नाही तोच अलीकडे उष्णताही वाढली आहे. लंडन, पॅरिसपासून स्टॉकहोमपर्यंत लोक उष्णतेमुळे त्रस्त झाले असून ते समुद्रकिनारी गर्दी करू लागले आहेत. ब्रिटनमध्ये गुरुवारी पारा ३४ अंशांवर पोहोचला. हा यंदाचा सर्वात उष्ण दिवस राहिला. वीकेंडपर्यंत पारा ३५ अंशांवर पोहोचेल, असा अंदाज आहे. याआधी १९७६ मधील जूनमध्ये एवढी उष्णता जाणवली होती. फ्रान्समध्ये तापमान ३६, स्पेनमध्ये ३८ अंशांवर गेले आहे. युरोपीय हवामान संस्थेने सात देशांत आगामी काही दिवसांत उष्णता वाढण्याची शक्यता वर्तवली आहे. बेल्जियम, एस्टोनिया, फिनलंड, लटाव्हिया, नेदरलँड्स, पोर्तुगाल, स्वीडनचा त्यात समावेश आहे.
Post a Comment