पॉझिटीव्ह’ आहेत, पण लक्षणे नाहीत आता घरीच उपचार
माय अहमदनगर वेब टीम
मुंबई - जगभर करोनाने थैमान घातले आहे. अनेक ठिकाणी खाजगी रुग्णालये ताब्यात घेऊन उपचार सुरु आहेत. अशातच एकीकडे करोनामुक्त होणाऱ्यांची संख्या वाढत असतानाच दुसरीकडे पाचव्या लॉकडाऊनमध्ये अर्थचक्राला गती देण्यासाठी राज्य सरकारने प्रयत्न सुरु केले आहेत.
यादरम्यान, बाधित रुग्णांच्या डिस्चार्जचा कालावधी कमी करण्यात आला तर प्रतिबंधित क्षेत्रातील जाचक नियम आणि अटी बदलत नागरिकांना काहीशा प्रमाणात शिथिलता दिली. यामध्ये आणखी बदल करण्यात आला असून जे रुग्ण बाधित आहेत, मात्र त्यांना लक्षणे नाही किंवा अतिसौम्य लक्षणे आहेत अशा रुग्णांना आता घरीच विलगीकरण कक्षात राहू देण्याचे निर्देश राज्य सरकारकडून देण्यात आले आहेत.
ज्या रुग्णांचे अहवाल बाधित आले आहेत, मात्र रुग्णांना अतिसौम्य किंवा लक्षणेच नसतील अशा रुग्णांना आता घरी उपचार घेता येतील. यामध्ये राज्य सरकारच्या नव्या नियमावलीनुसार लक्षण नसलेले, सौम्य व अति सौम्य लक्षणे, मध्यम तीव्र लक्षणे व तीव्र लक्षणांमध्ये वर्गीकरण करण्यात आले आहे.
यामध्ये कोविड केअर सेंटर (CCC) , डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर (DCHC), डेडिकेटेड कोवीड हॉस्पिटल (DCH) येथे दाखल करावयाचे आहे. तथापि, अति सौम्य किंवा लक्षणे नसलेल्या कोवीड पॉझिटीव्ह रुग्णांना जर त्यांचे घरामध्ये योग्य प्रकारे सुविधा उपलब्ध असतील तर त्यांच्या संमतीनुसार घरी विलगीकरणाचा पर्याय (Home Isolation) उपलब्ध करुन देता येणार आहे.
गृह विलगीकरणासाठी अशा आहेत सूचना
उपचार करणाऱ्या वैद्यकिय अधिकाऱ्यांनी रुग्णास अति सौम्य किंवा लक्षणे नसल्याबदल वैद्यकियदृष्टया प्रमाणित केलेले असावे.
संबधित रुग्णांच्या घरी त्यांच्या विलगीकरणासाठी तसेच कुटुंबातील व्यक्तींकरीता अलगीकरणासाठी (Home Qurantine) योग्य सोई-सुविधा उपलब्ध असाव्यात.
घरी दिवस-रात्र (24×7) काळजी घेणारी व्यक्ती उपलब्ध असावी.
संबधित काळजीवाहू व्यक्ती व उपचार देणारे रुग्णालय यांच्यामध्ये संपर्क व्यवस्था (दुरध्वनी/मोबाईल) उपलब्ध असणे अनिवार्य आहे.
वैद्यकिय अधिकाऱ्यांच्या सल्ल्यानुसार काळजीवाहू व्यक्ती व सर्व निकट संपर्कातील व्यक्तींनी प्रोटोकॉलनुसार हायड्रॉक्सी क्लोरोक्विनची मात्रा घ्यावी.
मोबाईलवर “आरोग्य सेतू’ अॅप डाऊनलोड करावे व ते सतत अॅक्टिव्ह(Bluetooth/Wifi द्वारे) असेल याविषयी दक्ष रहावे. (Link : https://www.mygov.in/aarogya-setu- app/)
रुग्णांनी स्वतःची काळजी घेणे व नियमितपणे प्रकृतीबाबत पाठपुराव्याविषयी जिल्हा सर्वेक्षण अधिकारी/सर्वेक्षण पथकास माहिती देणे अनिवार्य आहे.
रुग्णांने स्वतःचे गृह विलगीकरण करण्याविषयी प्रतिज्ञापत्र (परिशिष्ट-१) भरुन दयावे व सर्व मार्गदर्शक सुचनांचे पालन करावे. प्रतिज्ञापत्र दिल्यानंतर सदरील व्यक्ती गृह विलगीकरणासाठी पात्र ठरविण्यात येईल.
निकट सहवासितांना घरी करावायाच्या अलगीकरणासाठी (Home Qurantine) सविस्तर मार्गदर्शक सुचना खालील संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. (Link : https://www.mohfiw.gov.in/). काळजीवाहू व्यक्ती व रुग्णांसाठीच्या सुचना या परिशिष्ट क्र. २ मध्ये दिलेल्या आहेत.
वैद्यकिय मदत कधी घ्यावी?
रुग्णांने स्वतः व काळजीवाहू व्यक्तींनी त्यांच्या आरोग्यावर लक्ष ठेवावे.
खालीलपैकी कोणतेही गंभीर लक्षणे/चिन्हे आढळून आल्यास त्वरीत वैद्यकिय मदत घ्यावी.
धाप लागणे/श्वासोच्छवासास अडथळा निर्माण होणे, छातीमध्ये सतत दुखणे/वेदना होणे,
संभ्रमावस्था / शुध्द हरपणे.
ओठ/चेहरा निळसर पडणे
उपचार करणाऱ्या वैद्यकिय अधिकाऱ्यांची सल्ल्यानुसार, संदर्भ सेवेची गरज पडणे.
गृह विलगीकरण कधीपर्यंत करावे?
गृह विलगीकरण खाली ठेवलेल्या व्यक्तीला लक्षणे सुरु झाल्यानंतर १७ दिवसानंतर किंवा रुग्णाला लक्षणे नसेल (asymptomatic ) तर चाचणीसाठी नमुना ( sample) ज्या दिवसी घेतलेला असेल तेथून १७ दिवसानंतर आणि मागील १० दिवसांपासून ताप येत नसेल तर गृह विलगीकरणातून व्यक्तिस मुक्त करावे. गृह विलगीकरणाचा काळ संपल्यानंतर परत कोवीड-१९ साठी चाचणी करण्याची आवश्यकता नाही.
Post a Comment