घरात घुसुन वृध्देस बेदम मारहाण
माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर – काहीही एक कारण नसताना 65 वर्षीय वृध्देच्या घरात घुसून वृध्देस गळा दाबुन धमकावल्याची घटना चेतना लॉन शेजारी औरंगाबाद रोड येथे रविवारी (दि.14) दुपारी 4.30 वा. घडली.
श्रीमती पुष्पा रामचंद्र गायकवाड (वय-65, रा. अंजली निवास, चेतना लॉन शेजारी, औरंगाबाद रोड), या त्यांच्या सुनेसह कंपौंडमध्ये कांदे भरीत असताना सागर संतोष गायकवाड (रा. झापवाडी रोड, घोडेगाव) हा वॉलकंपौंडच्या भिंतीवरून उडी मारून घरात घुसला. पुष्पा गायकवाड यांनी तु कोण आहेस? व त्यास घराबाहेर हो, असे म्हणाल्याने त्याला राग आला व त्याने पुष्पा गायकवाड यांनी मारहाण करीत त्यांच्या गळा दाबला. मध्यस्थी करण्यास येत असलेल्या त्यांच्या सुनेलाही लोटुन दिल्याने ती खाली पडली व तीस मुक्का मार लागला.
या प्रकरणी पुष्पा गायकवाड याने दिलेल्या फिर्यादीवरून तोफखाना पोलिसांनी भारतीय दंड विधान कलम 452, 323 प्रमाणे मारहाणीच्या गुन्ह्याची नोंद केली आहे. अधिक तपास पोलिस नाईक आव्हाड हे करीत आहेत.
Post a Comment