वाहन उद्योगातून सुवार्ता


माय अहमदनगर वेब टीम
मागील काही दिवसांपासून जीएसटीसह अन्य निर्णयामुळे वाहन क्षेत्रात मंदीचे वारे वेगाने वाहत होते. त्यामध्ये चालू आर्थिक वर्षात ही मरगळ कमी करण्यासाठी विविध टप्प्यावर प्रयत्न करण्यात येणार असल्याचे धोरण राबविण्यात येणार होते. परंतु याला कोविडच्या संकटाने पुन्हा मागे ढकलले असल्याचे दिसून आले आहे. आता लॉकडाऊनमध्ये काही प्रमाणात शिथिलता मिळत असून देशात अनलॉक 1 ची सुरुवात झाली असून याचा फायदा वाहन क्षेत्रातील काही विभागांना सध्या होत असल्याचे निरीक्षणामधून सांगितले जात आहे.

सामाजिक अंतर राखत व अन्य सुरक्षेचे नियम पाळत ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरील मिळणा-या सुविधेच्या जोरावर देशातील तीन मोठ्या कार कंपन्यांचे बुकिंग वेगाने होत आहे. यामध्ये प्रामुख्याने मारुती सुझुकी, ह्युंडाई आणि महिंद्रा अॅण्ड महिंद्रा या कंपन्यांच्या कार्सना मागणी वाढली असून कार्सच्या बुकिंगमध्ये आणि चौकशीत वाढ झाली असून याचा वेग कोविड 19 च्या अगोदरच्या कालावधीपेक्षा जवळपास 85 टक्क्यांवर पोहोचला आहे.

बुकिंगसह अन्य गोष्टींची चौकशी करण्यासाठी कोरोनाच्या भीतीपोटी ग्राहक सध्या फोन कॉल करुन कार खरेदीसह अन्य माहिती जास्तीत जास्त विचारताना दिसत आहेत. अशांची संख्या अलीकडे वाढलेली आहे. कार कंपन्यांनी हॉट मॉडेल्सचे प्री बुकिंग सुरु केले होते. होंडा कार्स इंडिया लिमिटेडने आपल्या लोकप्रिय असणा-या सेडन कार सिव्हीकच्या बीएस 6 प्रणालीच्या मॉडेलचे प्री बुकिंग सुरु केले आहे तर पेटाने नवीन गाडीच्या बुकिंगमध्ये 30 हजारांचा टप्पा पार केला आहे. तज्ञांच्या माहितीनुसार येत्या काळातही यात वाढ होण्याची अपेक्षा आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post