पेट्रोल-डिझेलचे दर कमी करा अन्यथा आंदोलन
माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर- इंधनाच्या किंमती कमी करुन कोरोनाच्या प्रादुर्भावाने होरपळणार्या जनतेला दिलासा देण्याचे काम भाजपचे केंद्र सरकार करणार आहे का? अच्छे दिन याला म्हणावयाचे का? असा सवाल उपस्थित करत पेट्रोल- डिझेलच्या वाढत्या किंमती कमी करण्याची मागणी अहमदनगर शहर काँग्रेस पक्षाने केली आहे. शहर काँग्रेस, भिंगार काँग्रेस, महिला काँग्रेस आणि पक्षाच्या अल्पसंख्यांक विभागाच्यावतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन इंधनाचे दर कमी करण्याची मागणी करण्यात आली.
शहराध्यक्ष बाळासाहेब भुजबळ, भिंगार अध्यक्ष अॅड.आर.आर.पिल्ले, अल्पसंख्याक विभागाचे प्रदेश सरचिटणीस फिरोज शफी खान, पक्षाचे शहर सरचिटणीस अभिजित कांबळे आदिंनी सुरक्षित अंतर ठेवून जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले व जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निर्देशने केली. यावेळी प्रांतिक सदस्य शामराव वाघस्कर, शहर चिटणीस मुकुंद लखापती, महिला काँग्रेसच्या सौ.अलका बोरुडे, सरचिटणीस सुभाष रणदिवे, भिंगार काँग्रेस सचिव निजाम पठाण आदि उपस्थित होते.
Post a Comment