अभिषेक बच्चनने करिअरचा वाईट काळ आठवताना म्हटले
माय अहमदनगर वेब टीम
मुंबई - अभिनेता अभिषेक बच्चन लवकरच 'ब्रीद : इंटू द शॅडो' या वेब सीरिजच्या माध्यमातून डिजिटल पदार्पण करतोय. अलीकडेच त्याने एका मुलाखतीत आपल्या चित्रपट कारकिर्दीबद्दल बर्याच गोष्टी सांगितल्या आहेत. राजीव मसंद यांना दिलेल्या मुलाखतीत तो म्हणाले की, माझा पहिला चित्रपट रेफ्यूजीच्या प्रीमिअर वेळी यश चोप्रा यांनी मला एक सल्ला दिला होता. ते म्हणाले होते, लक्षात ठेव, तुझ्या वडिलांनी तुला इथवर आणले आहे. पण जेव्हा तू या क्षेत्रात पुढे पाऊल टाकशील तेव्हा सर्व काही मागे राहिले आणि तुला स्वतःच्या पायावर चालावे लागेल.
चित्रपटसृष्टीतील पदार्पणाविषयी अभिषेक म्हणाला, मी 'डेड मॅन वॉकिंग' हा चित्रपट पाहिल्यानंतर चित्रपटांमध्ये काम करण्याचा निर्णय घेतला. माझी ही इच्छा माझ्या आईवडिलांकडे बोलून दाखवली. सर्वप्रथम तुम्हाला संकोचातून मुक्त व्हावे लागते, तेही जेव्हा तो फॅमिली बिझनेस असतो. तुम्ही व्यावहारिक असू शकत नाही. हा भावनिक निर्णय असतो, असे अभिषेकने सांगितले.
चार वर्षांचा काळ अतिशय वाईट होता : अभिषेकने मुलाखतीत सांगितले की, तब्बल चार वर्षे त्याचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर चालले नाहीत. तो म्हणतो, तो काळ नरक यातना देणारा होता. प्रत्येकाची स्वतःची एक जर्नी असते. आपण दुसर्याच्या जर्नीला जज करु शकत नाही. मीदेखील मागे बघून गोष्टींना दोष देत बसलो नाही. अर्थात त्या काळाचा सामना करणे खूप कठीण होते. परंतु त्याचबरोबर त्या सर्व चित्रपटांचा एक भाग असल्याचा आनंददेखील होता. कारण कोट्यवधी लोकांचे ते स्वप्न असते. मग तक्रार का करायची?, असे अभिषेक म्हणाला.
आगामी काळात अभिषेक 'द बिग बुल', 'बॉब बिस्वास' आणि 'लुडो' या चित्रपटांमध्ये दिसणार आहे
Post a Comment