केस नैसर्गिकरित्या चमकदार कसे ठेवाल ?
माय अहमदनगर वेब टीम
हेल्थ डेस्क - डोक्यात कोंडा होण्याची तक्रार विशेषत: हिवाळ्यातच अधिक केली जाते. वातावरणातील बदलामुळे हे घडते. त्याचप्रमाणे केस गळणे, कोरडे, शुष्क होणे अशी तक्रारी ऑलसीझन असतात. त्या उद्भवू नयेत, यासाठी केसांची काळजी घेणे आवश्यक आहे. आपली त्वचा, चेहरा याच प्रमाणेच आपले केसही आपल्या व्यक्तिमत्त्वात भर टाकतात. खबार कोरडे आणि कोंडायुक्त केसांमुळे आपले व्यक्तिमत्त्च बिघडते. हिवाळ्यात डोक्यात कोंडा होण्याची समस्या सामान्य आहे.
हा कोंडा म्हणजेच कोणता बाह्य घटक नसून, आपल्याच खोपडीच्या त्वचेने निघालेल्या खपल्या असतात. हा कोंडाही कोरडा किंवा तेलकट (ग्रीजी) असा दोन प्रकार असतो. केसांमध्ये कोंडा होउ नये, केस गळू नयेत आणि स्वस्थ, चमकदार राहावेत, त्यांची मूळ नैसर्गिक झळाळी टिकवून ठेवण्यासाठी जरा जास्त काळजी घेणे आवश्यक आहे, डोक्याच्या बाह्य त्वचेवर तैलग्रंथींकडून स्त्राव स्त्रवण्याचे कार्य सुरळीत सूरु रहावे, यासाठी टाळूला उत्तेजना मिळणे आवश्यक असते. त्यामुळे केसांच्या कंडिशनिंग सोबतच डोक्याच्या त्वचेला मसाज सारख्या उपायांना सचेत केले पाहिजे.
Post a Comment