एमपीएससी परीक्षांचे सुधारित वेळापत्रक जाहीर



माय अहमदनगर वेब टिम
पुणे – करोनाच्या पार्श्वभूमीवर पुढे ढकलण्यात आलेल्या विविध परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. नवीन वेळापत्रकानुसार मराज्य सेवा पूर्व परीक्षा 2020फ येत्या 13 सप्टेंबर रोजी घेतली जाणार आहे. तर म महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा 2020 येत्या 11 ऑक्टोबर रोजी आणि म महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा 2020फ येत्या 1 नोव्हेंबर रोजी घेतली जाणार आहे.

करोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरू असलेल्या प्रतिबंधात्मक उपाय योजना व लॉकडाऊनचा कालावधी लक्षात घेऊन एमपीएससीतर्फे एप्रिल-मे 2020 मध्ये आयोजित करण्यात आलेल्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या. परंतु ,राज्य शासनातर्फे बहुतांश गोष्टी सुरू करण्यात आल्या आहेत. त्यामुळे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने पुढे ढकललेल्या तीन परीक्षांचे सुधारीत वेळापत्रक प्रसिद्ध केले आहे.

दरम्यान, पुण्यासह विविध शहरांमध्ये स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणारे विद्यार्थी करोनामुळे आपल्या गावी गेले आहेत. त्यातील अनेक विद्यार्थ्यांनी पुणे हे परीक्षा केंद्र निवडले आहे. परंतु , विद्यार्थ्यांना आपल्या गावाजवळील परीक्षा केंद्रांमध्ये परीक्षा देता यावी, यासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने परीक्षा केंद्र बदलाची सुविधा उपलब्ध करून द्यावी ,अशी मागणी स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणार्‍या विद्यार्थ्यांकडून केली जात आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post