चोरट्यांनी मंदिर फोडले
माय अहमदनगर वेब टीम
श्रीगोंदा – तालुक्यातील येळपणे गावातील ग्रामदैवत खंडेश्वर मंदिरातील सुमारे दोन लाख किमंतीचा चांदीचा मुखवटा व सोन्याचे दागिने चोरट्यांनी लंपास केले. ही घटना रविवारी मध्यरात्री घडली आहे. गावकऱ्यांना माहिती समजताच घटनास्थळी गावकरी जमा झाले.
खंडेश्वर महाराजांसाठी पाच किलो वजनाचा चांदीचा मुखवटा व दोन तोळे सोन्याचे दागिने केले होते. मंदिराचे जिर्णोद्धाराचे काम गेल्या काही महिन्यांपासून चालू आहे. खंडेश्वर महाराजांचा चांदीचा मुखवटा चोरीस गेला आहे. घटना स्थळी पोलिस अधिकारी, श्वान पथक व ठसे तज्ञ यासह उपविभागीय पोलीस अधिकारी दाखल झाले आहेत.
Post a Comment