पुणे – अवघ्या चार महिन्याच्या बाळाला येथील चांदणी चौकातील झुडपात सोडून जाणार्या महिलेला कोथरूड पोलिसांनी काही तासात बेड्या ठोकल्या.
चांदणी चौकातून कोथरूडकडे येणार्या रस्त्याच्या बाजूला अज्ञात व्यक्तींकडून 4 महिन्यांचे स्त्री जातीचे बाळ सोडून दिल्याचा प्रकार गुरुवारी सायंकाळी समोर आला होता. कोथरुड येथे सायंकाळी पावणे सहा वाजता चांदणी चौकातील उतारावरील भागातून नागरिकांना बाळाच्या रडण्याचा आवाज ऐकू आला. त्यांनी तेथेच असलेल्या वाहतूक पोलिसांना सांगितले. पोलिस त्या ठिकाणी गेले, त्यावेळी कापडात बांधून टाकून दिलेले अवघ्या पाच महिन्याचे बाळ पावसात भिजताना दिसले. पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता त्याला उचलून घेतले. त्या इवलुश्या गोडुलीच्या स्मितहास्याने पोलिसही क्षणभर गहिवरले.
कानाला वारा लागू नये म्हणून बाळाच्या डोक्याला कानटोपी गुंडाळलेली होती. कपाळावर छानसा काळा टिळा होता. दृष्ट लागू नये म्हणून गालाला हलकासा काळा टिक्का लावलेला. अंगात फुल बाह्यांचा निळा शर्ट, त्यावर एक पांढरा शर्ट, गुलाबी फुल पँट, पायात मोजे, थंडीपासून संरक्षण व्हावे म्हणून अंगावर पांघरलेली निळी शाल असे सर्व तर्हेने सुरक्षित असलेले चार महिन्याचे बाळ एका झुडपाखाली ठेवले होते.
चांदणी चौकातील पाण्याच्या टाकीकडे जाणार्या रस्त्यावर एका झुडुपाखाली हे गोंडस बाळ गुरुवारी रात्री सापडले होते. बाळाबद्दलची बातमी समजताच वाहतूक पोलिसांनी तिला ताब्यात घेतले होते. वाहतूक पोलिसांनी या बाळाला कोथरुड पोलिसांकडे सुपूर्द केले. त्यानंतर या बाळाला ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. नागरिकांना या बाळाबद्दल काहीही माहिती असल्यास कोथरुड पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले होते. बाळाच्या जन्मदात्यांचा शोध घेण्यासाठी आजूबाजूच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज वा स्थानिक लोक यांची मदत घेत पोलिसांनीच या मातेला शोधून काढले.
वारजे वाहतूक विभागामध्ये पोलिस हवालदार असलेले सुरेश शिंदे व पोलिस शिपाई सुजय पवार हे दोघेही त्यांच्या सहकार्यासमवेत गुरुवारी चांदणी चौकात वाहतूक नियमन करीत होते. सायंकाळी पावणेसहा वाजता पावसाची रिपरीप सुरु होती. तेवठ्यात कोथरुडच्या दिशेने जाणार्या उताराच्या रस्त्याच्याकडेला भागात नागरीकांना एका बाळाच्या रडण्याचा आवाज ऐकू आला. त्यांनी याबाबत शिंदे व पवार यांना सांगितले. त्यामुळे ते दोघेही धावतच तेथे गेले. त्यावेळी कपडयात बांधलेले बाळ पावसातच कोणीतरी सोडून गेल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. दोघांनीही बाळाला उचलून घेत आपल्या कवटाळले. ते भुकेने व्याकुळ झाल्याचे पाहुन पोलिसांनी लगेचच त्याच्यासाठी दुधाची व्यवस्था केली. व स्थानिक कोथरुड चे नगरसेवक किरण दगे पाटिल यांनी सुद्धा तिथे तत्काळ येऊन पुढील तपासासाठी पोलिसांना सहकार्य केले.
महिला वारंवार चिडून घर सोडून जात असल्याची माहिती तिच्या पतीने दिली आहे. चार महिन्यांच्या बाळाला रस्त्यात सोडल्याप्रकरणी पोलिसांनी काल रात्री गुन्हा दाखल केला होता. या अंतर्गत तिला अटक करण्यात आली आहे.
Post a Comment