...म्हणून नगर शहरातील व्यापारी बाजारपेठ बंद




माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर- नगर शहरासह जिल्ह्यात मागील तीन दिवसांपासून कोरोनाबाधित रूग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. नगर शहर ही जिल्ह्याची बाजारपेठ असल्याने शहरात कायम मोठी वर्दळ असते. मात्र कोरोनाग्रस्तांची वाढती संख्या लक्षात घेवून प्रशासनाला सहकार्य करण्यासाठी नगरमधील बाजारपेठ रविवार 28 ते 30 जून या कालावधीत स्वयंस्फूर्तीने बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती दि अहमदनगर आडतेबाजार मर्चंटस् असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र चोपडा व सेक्रेटरी संतोष बोरा यांनी दिली.

कोरोनामुळे लागू झालेल्या लॉकडाऊन काळात प्रशासनाने नगरमध्ये व्यापार्‍यांना नेहमीच सहकार्य केले आहे. शहरात व जिल्ह्यातही रूग्णसंख्या वाढत असल्याने सर्वांनीच काळजी घेणे गरजेचे बनले आहे. त्यादृष्टीने रविवारपासून सलग तीन दिवस 30 जूनपर्यंत मार्केटयार्ड, आडतेबाजार, दाळमंडई, तापकिरगल्ली, दाणेडबरा व परिसरातील व्यापारी पेठ बंद ठेवण्यात येणार असल्याचे असोसिएशनने प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळवले आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post