भरदिवसा चोरट्यांनी फोडले घर
माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर – बंद घराचे कुलूप तोडुन दरवाजातुन आत प्रवेश करून अज्ञात चोरांनी घरातील 63 हजार 500 रूपयांची रोख रक्कम चोरून नेली. ही घटना सोमवारी (दि.15) सकाळी 11.30 ते 5.30 च्या दरम्यान आदित्य रेसिडेन्सी, गजराज फॅक्टरीसमोर, भिस्तबाग चौकाजवळ, पाईपलाईन रोड येथे घडली.
याबाबतची तक्रार मंगळवारी (दि.16) दुपारी तोफखाना पोलिस स्टेशनला देण्यात आली आहे. याबाबतची अधिक माहिती अशी की, अमरजा गणेश कुलकर्णी (वय-35, रा. आदित्य रेसिडेन्सी, गजराज फॅक्टरीसमोर, भिस्तबाग चौकाजवळ, पाईपलाईन रोड, नगर) यांच्या बंद घराचे कुलूप तोडुन अज्ञात चोरट्यांनी तोडुन आत प्रवेश केला. आतील सामानाची उचकापाचक करून कपाटातील 63 हजार 500 रूपये रोख चोरून नेले.
या प्रकरणी अमरजा कुलकर्णी यांच्या फिर्यादीवरून तोफखाना पोलिसांनी भारतीय दंड विधान कायदा कलम 454, 380 प्रमाणे घरफोडीच्या गुन्ह्याची नोंद केली आहे. अधिक तपास पोलिस नाईक दीपक जाधव हे करीत आहेत.
Post a Comment