माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर - राज्याची धमणी आणि सर्वसामान्यांचे दळणवळणाचे प्रमुख साधन असणारी एसटी महामंडळाच करोनामुळे लॉकडाऊन झाले. मात्र, त्यानंतर गेल्या 15 ते 20 दिवसांपासून जिल्ह्यात निवड मार्गावर आणि तालुक्याच्या ठिकाणी एसटीच्या बसेस धावत असल्या तरी त्यांना प्रवाशांचा वनवा जाणवत आहे. मात्र, काही दिवसांपूर्वी एसटीने सुरू केलेला मालवाहतूकीचा निर्णय चांगलाच पथ्यावर पडतांना दिसत असून 15 दिवसात एसटी महामंडळाच्या 20 ट्रकांनी माल वाहतूक केली आहे. यामुळे आता एसटीची वाटचाल प्रवासी वाहतूकीसोबतच माल वाहतुकीकडे होतांना दिसत आहे.
जिल्ह्यात एसटी महामंडळाचे मोठे जाळे आहे. 11 आगार शहरातील तीन यासह ग्रामीण भागात 13 बसस्थानके आहेत. या ठिकाणी करोना लॉकडाऊनपूर्वी हजारोंच्या संख्याने प्रवासी वाहतूक एसटी महामंडळाकडून सुरू होती. मात्र, 20 मार्चपासून लॉकडाऊन सुरू झाल्याने एसटीचे चाके डेपोत रूतून बसली. गेल्या महिन्यांत सरकारने काही प्रमाणात लॉकडाऊनमध्ये शिथीलता दिल्यानंतर 24 मे नंतर जिल्ह्यात एसटी बसेसची चाके फिरू लागली. मात्र, निवड मार्ग आणि तालुक्याच्या ठिकाणी सुरू असणार्या वाहतूक सेवेत प्रवासी भेट नसल्याने सध्या एसटी महामंडळाच्या बहुतांशी गाड्या रिकाम्याच धावत आहेत.
सरकारने एसटी महामंडळाच्या बसेस सुरू केल्यानंतर सामाजिक अंतर पाळण्यासाठी प्रत्येक बसेसमध्ये 50 टक्केच प्रवासी भरावेत अशी अट टाकली. यामुळे एका बसमध्ये केवळ 22 प्रवासी प्रवास करत असल्याने एसटीची सेवा तोट्यात सुरू आहे. नगर विभागातर्फे जिल्ह्यात सध्या केवळ 30 गाड्या सुरू करण्यात आल्या. पहिल्या टप्प्यात त्या केवळ तालुका स्तरावर सुरू आहेत. परंतु त्यालाही प्रवासी नाहीत. त्यामुळे एसटीला मोठा तोटा होत आहे. अनेक आगार रिकामी असून तुरळक प्रवासी एसटीच्या बसेसमधून प्रवास करताना आढळत आहेत. दरम्यानच्या काळात एसटी महामंडळाने शेतकर्यांच्या मालासह अन्य साहित्याची, धान्यांची वाहतूक करण्याचा निर्णय घेतला आहे. वाहतूकीला प्रतिसाद मिळतांना दिसत आहे. बाजार भावापेक्षा काही कमी दरात एसटी माल वाहतूक करतांना दिसत आहे.
माल वाहतुकीचा प्रकार, वजन आणि किलो मीटरनूसार एसटी महामंडळाचे अधिकारी माल वाहतुकीचा दर निश्चित करत आहेत. हे दर कमी-अधिक करून निश्चित करण्याचे अधिकारी एसटी प्रशासनाने जिल्हा पातळीवरील अधिकार्यांना दिले आहेत. त्यानूसार सध्या एसटीच्या ट्रकमधून मालवाहतूक करण्यात येत असल्याचे विभाग नियंत्रक विजय गिते यांनी सांगितले.
Post a Comment