तंबाखु दिली नाही म्हणून एकास बेदम मारहाण



माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर - तंबाखु खाण्यास दिली नाही याचा राग येऊन हाताच्या चापटीने व हातोडीने मारहाण व शिवीगाळ करून जखमी केले. ही घटना भिंगार येथील सोलापुर रोडवर रविवारी (दि.21) सायंकाळी 6.30 वा. घडली.

याबाबतची माहिती अशी की, रमेश गिरीधारी छजलानी (वय 55, रा. हरी मळा, सोलापुर रोड) हे सायंकाळी फिरावयास गेले असता तेथे दीपक उर्फ दीपु रामसिंग चव्हाण हा तेथे आले व छजलानी यास तंबाखु दे, असे सांगितले. यावर छजलानी याने माझ्याकडे तंबाखु नाही, असे सांगितले. याचा राग आल्याने चव्हाण याने छजलानी यास हाताच्या चापटीने तोंडात व हातोड्याने उजव्या पायाच्या पंज्यावर मारहाण करून जखमी केले.

या प्रकरणी रमेश छजलानी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भिंगार कॅम्प पोलिसांनी भारतीय दंड विधान कलम 323, 326, 504 प्रमाणे मारहाणीच्या गुन्ह्याची नोंद केली आहे. अधिक तपास पोलिस नाईक बी.पी. गायकवाड हे करीत आहेत.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post