ही योजना पूर्ण झाल्यावर शहराला मिळणार पाणी



माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर- अनेक वर्षापूर्वीची पाणी योजना असल्यामुळे नगर शहरामध्ये ठिकठिकाणी पाणी टंचाई होत आहे. यासाठी केंद्र सरकारने फेज-2 पाणी योजना मंजूर करून दिली असून आज या योजनेचे काम शहरामध्ये अंतिम टप्यात आले आहे. त्याचबरोबर अमृत पाणी योजनेच्या कामासाठी मोठया प्रमाणात निधी दिला आहे. आज हे काम अतिशय जलद गतीने सुरू आहे. या दोन्ही योजना पूर्ण झाल्याानंतर नगर शहराला पूर्ण दाबाने पाणी पुरवठा होणार आहे. त्यामुळे नगर शहराचा कायमचा पाणीप्रश्न मिटणार आहे, असे प्रतिपादन महापौर बाबासाहेब वाकळे यांनी केले.

प्रभाग क्र. 6 च्या नगरसेविका सौ.वंदनाताई ताठे यांच्या प्रयत्नातून भिंगारदिवे मळा येथील पाणी योजनेला मंजूरी मिळाली. या योजनेचा शुभारंभ महापौर बाबासाहेब वाकळे यांचे हस्ते संपन्न झाला. यावेळी भाजपा शहर जिल्हाध्यक्ष महेंद्र गंधे, नगरसेवक रविंद्र बारस्कर, माजी नगरसेवक सुवेंद्र गांधी, भाजपा मंडल अध्यक्ष अजय चितळे, विलास ताठे, मनोज ताठे, अशोक वाकळे, बाळासाहेब वाकळे, नारायण सुंबे, बाळासाहेब पुंड, दत्तात्रय राजापुरे, शंकर आव्हाड, बाळू मराठे, राहुल पवार, ब्रिजेश ताठे, संकेत ताठे, श्रीमती पुष्पाताई पुंड, श्रीमती पल्लवीताई भागवत, अॅड.श्रीमती राणीताई भुतकर, श्रीमती संगिताताई भागवत, श्रीमती जयश्रीताई पवार, श्रीमती मिराताई सुंबे, श्रीमती सीमताई भुसे, संजय पवार, रमेश गुंजाळ, उरणकर आदी उपस्थित होते.


महापौर वाकळे पुढे म्हणाले की, भिंगारदिवे मळा येथे वर्षापासून पाणीटंचाई होत असल्यामुळे नागरिकांना पाणी टंचाईच्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. प्रभाग क्र. 6 च्या नगरसेविका सौ.वंदनाताई ताठे यांनी भूतकरवाडी चौकापासून ते भिंगारदिवे मळ्यापर्यंत पाणी योजना होण्यासाठी मनपाकडे वारंवार पाठपुरावा केल्यामुळे आज हे काम मार्गी लागले असून लवकरच या भागाला पूर्ण दाबाने पाणी पुरवठा होणार आहे. कायमचा पाणी प्रश्न सुटणार आहे.

नगरसेविका सौ.वंदनाताई ताठे म्हणाल्या की, महिलांचा अत्यंत जिव्हाळ्याचा प्रश्न म्हणजे पाणी प्रश्न, महिलांना दैनंदिन कामकाजामध्ये पाणी मोठ्या प्रमाणात लागते. भिंगारदिवे मळ्यामध्ये अनेक वर्षापासून या भागातील महिलांना पाणी प्रश्नाला सामोरे जावे लागत आहे. हा प्रश्न सुटावा यासाठी या भागातील महिला माझ्याकडे वारंवार पाठपुरावा करीत होत्या. महिलांचे प्रश्न सुटावे यासाठी महापौर यांचेकडे पाठपुरावा केला. त्यामुळे हा पाणी प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागला. लवकरच या भागाला पूर्ण दाबाने पाणी पुरवठा होणार आहे. प्रभागामधील महिलांचे प्रश्न सुटावे यासाठी कायम तत्पर राहील.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post