राज्यातील २५६१ पोलिसांना करोनाची लागण
माय अहमदनगर वेब टीम
मुंबई - राज्यातील करोनाची परिस्थिती पाहता येत्या ३० जून पर्यत लॉकडाऊनचे आदेश कायम राहणार आहेत. याच दरम्यान, आता गेल्या २४ तासात पोलीस दलातील आणखी ४ जणांना कोरोनाची लागण झाली असून एकाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे पोलीस दलातील एकूण २५६१ जणांची करोनाची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे.
दरम्यान देशभरासह महाराष्ट्रात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. त्यामुळे नागरिकांना स्वत:सह परिवाराची काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. यातच अहोरात्र सेवा बजावणाऱ्या पोलिसांना दिवसेंदिवस करोनाचा सामना करावा लागत आहे.
राज्यातील बहुतांश जिल्हे हे करोनाच्या विळख्यात अडकल्याने त्यांना रेड झोन घोषित करण्यात आले आहे. मुंबई आणि पुण्यात कोरोनाचे सर्वाधित रुग्ण आढळून आल्याने कोरोनाच्या पार्श्वभुमीवर तेथे सर्वोतोपरी खबरदारी घेण्यात येत आहे. करोनाबाधित रुग्णांचा आकडा दिवसागणिक वाढत असला तरीही वैद्यकिय कर्मचारी, डॉक्टर्स आणि नर्स आपले कर्तव्य २४ तास बजावताना दिसून येत आहेत.
त्याचसोबत करोनाबाधित रुग्णांची अडचण होऊ नये म्हणून विविध ठिकाणी कोविड आणि क्वारंटाइन सेंटरची सुद्धा उभारणी करण्यात आली आहे. राज्य सरकार करोनाच्या विरोधात लढण्यासाठी वेळोवेळी योग्य त्या नियमांची अंमलबजावणी करताना दिसून येत आहे.
Post a Comment