माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर – नगर शहरामध्ये कोरोनाचा प्रार्दुभाव दिवसेंदिवस वाढत आहे. गेल्या तीनचार दिवसामध्ये शहरातील कोरोनाबाधित रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. जिल्हा रुग्णालयात असलेल्या कोरोना टेस्टींग लॅबमध्ये संपूर्ण जिल्ह्यातील चाचण्या होत असल्याने अहवाल येण्यास विलंब होत आहे. त्यामुळे शहरातील नागरिकांच्या कोरोना चाचण्या तातडीने होण्यासाठी महापालिकेच्यावतीने स्वतंत्र कोरोना टेस्टींग लॅब सुरु करण्यात यावी, तसेच त्यासाठी असलेल्या आवश्यक परवानग्यांची तातडीने पूर्तता करावी, अशी मागणी नगरसेविका सोनाली चितळे यांनी केली आहे.
याबाबत महापालिका आयुक्त श्रीकांत मायकलवार यांना दिलेल्या निवेदनात त्यांनी म्हंटले आहे की, शहरात कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या नागरिकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यांची कोरोना टेस्ट करण्यासाठी महापालिकेचे डॉक्टर नागरिकांना सिव्हील हॉस्पीटलमध्ये तपासणीकरिता पाठवितात. सिव्हील हॉस्पीटलमध्ये संपूर्ण जिल्हयातून कोरोना तपासणीकरिता रुग्ण मोठ्या संख्येने येत असल्याने सिव्हीलमध्ये तपासणीसाठी गेलेल्या सर्व नागरिकांची टेस्ट न करता तसेच पुन्हा घरी पाठवितात.
Post a Comment