विद्यार्थ्यांनी भरलेली परीक्षा फी मुख्यमंत्री सहाय्यता निधीत वर्ग करावी



माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर- सर्व वर्गाच्या पाठोपाठ अंतिम वर्षाच्या वर्गाच्या परीक्षा देखील कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे रद्द करण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतलेला आहे. परंतु परीक्षांचे शुल्क विद्यापीठाकडे विद्यार्थ्यांनी आगोदरच जमा केलेले आहे. सध्या अचानक उद्भवलेल्या कोरोनाच्या संकटामुळे राज्यसरकार खुप मोठ्या आर्थिक संकटात सापडलेले आहे आगामी काळात आरोग्यसुविधेला अधिकतम महत्व देऊन आरोग्य सुविधा निर्माण करण्यासाठी राज्य सरकार देखील मोठमोठी पावले उचलत आहे आणि म्हणुनच या पार्श्वभूमीवर आम्हीही समाजाचे काहीतरी देणे लागतो या हेतूने मनामधे संकुचित वृत्ती न ठेवता आम्ही शेतकरी विद्यार्थ्यांनी भरलेली परिक्षा फी (गुणपत्रिकेसाठी व विद्यापीठास लागणारा इतर खर्च वगळता उर्वरित रक्कम) मुख्यमंत्री साहाय्यता निधीमधे वर्ग केल्यास विद्यार्थ्यांना देखील निकालपत्र घेताना आनंद वाटेल, असे राहुल मते यांनी विद्यापीठास पाठविलेल्या निवेदनात म्हटले आहे.

शिक्षणाचा खेळखंडोबा होण्यापेक्षा आणि विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळण्यापेक्षा आतापर्यंत झालेल्या सर्व सेमिस्टरची सरासरी काढुन विद्यार्थ्यांना गुण देण्याचा निर्णय अतिशय योग्य आहे. कारण बाळाचे पाय पाळण्यात दिसतात अशी आपल्याकडे म्हण आहे अगदी त्याच पद्धतीने विद्यार्थ्यांचे पाठीमागचे असणारे मार्क्स आणीबाणीच्या काळात पाहीले आणि त्या सरासरीनुसार त्यांना जर मार्क्स दिले तर त्यात वावगे काही नाही या कठीण काळात देखील राष्ट्रीय सेवा योजनेचे काही विद्यार्थी आपापल्या परीने योग्य ती मदत करुन सामाजीक बांधीलकी जपण्याचा प्रयत्न करत आहेत. काही लहान विद्यार्थ्यांनी तर आपल्या खाऊसाठी साठवलेले पैसेदेखील मुख्यमंत्री साहाय्यता निधीमधे दिले आहेत यावरुनच परिस्थिती किती गंभीर आणि कठीण आहे हे आपल्या लक्षात येईल. या कठीण काळात देखील कोणी उपाशी राहु नये म्हणुन राज्य सरकार योग्य ती काळजी घेत आहे. आरोग्यमंत्री, गृहमंत्री, अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री एखद्या व्रतस्थ कार्यकर्त्याप्रमाणे कुठलाही प्रसिद्धीचा आविर्भाव न करता एकनिष्ठपणे काम करत आहेत आणि आपल्या आसपास गावात एखादी व्यक्ती उपाशीपोटी झोपत असेल आणि आपण जर त्यांच्या मुखात दोन घास घालू शकत नसलो तर आपल्याला माणूस म्हणून घेण्याचा अधिकार नसतो असं माझं मत आहे ज्या पद्धतीने एखाद्या कुटुंबावर संकट कोसळले की त्या कुटुंबातील प्रत्येक माणूस कुटुंबाला सावरण्यासाठी मिळेल ती गोष्ट करतो अगदी त्याचप्रमाणे महाराष्ट्र हे देखील विद्यार्थ्यांचे कुटुंब आहे आणि आपले कुटुंब सुरक्षेसाठी कुटुंबात राहणार्‍या प्रत्येक सदस्याने तत्परता दाखवणे गरजेचे आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post