येत्या दोन महिन्यांत करोना रुग्ण वाढणार



माय अहमदनगर वेब टीम
पुणे – दिवसागणिक करोनाग्रस्तांमध्ये वाढ होत चालल्याचे दिसून येत आहे. मागील आठवड्यापर्यंत साधारण तीन ते साडे तीन हजार च्या आसपास करोनाचे रूग्ण एका दिवसाला मिळायचे. परंतु हा आकडा आता हा पाच हजारापर्यंत गेला आहे. अशातच आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी करोनाग्रस्तांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली आहे.

पुढच्या जुलै आणि ऑगस्ट महिन्यात करोनाच्या रुग्णांची संख्या वाढू शकते, अशी भीती राजेश टोपेंनी व्यक्त केली आहे. रुग्णसंख्या वाढण्याची चिंता नाही, पण मृत्यूदर वाढू नये यावर आम्ही काम करतो आहे, असं राजेश टोपे म्हणाले.

करोना रूग्णांकडून खाजगी रूग्णालय जास्त पैसे आकारण्यात येत असल्याच्या अनेक तक्रारीमागील काही दिवसापासून केल्या जात होत्या. सरकारनंही या बाबीकडे लक्ष देत, खाजगी रूग्णालयानं शासकीय निर्देशाचे पालन न केल्यास संबधीत रुग्णालयावर कठोर कारवाईच करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

मुंबईतली रुग्णसंख्या कमी होईल, पण मुंबई-पुण्यातून राज्यातल्या इतर भागात गेलेल्या काही संशयीत रुग्णांमुळे तिथे करोना रुग्णसंख्या वाढण्याची शक्यता असल्याचं आरोग्यमंत्र्यांनी सांगितलं.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post