राज्यातील धार्मिक स्थळे सुरू करा
माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर- राज्यात लॉकडाऊन सुरु झाल्यापासून राज्यातील सर्व धार्मिक स्थळे बंद करण्यात आली आहेत. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे उद्भवलेली परिस्थिती आता बदल होत आहे. शासनाच्यावतीनेही टप्प्याटप्प्याने लॉकडाऊन शिथिल करण्यात येत आहे. आजच्या परिस्थितीत नागरिकांना आत्मिक शांती फार गरज आहे. दुर्दैवाने समाजाला सन्मार्ग दाखवणारे संत आता येणार नाहीत. अशा परिस्थितीत नागरिकांना आत्मिक शांती, प्रेरणा मिळण्याचे धार्मिक स्थळे हे एकमेव स्थान आहे.
राज्यातील सर्व छोट्या – मोठ्या धार्मिक स्थानकावर उदरनिर्वाह असणारे हजारो नागरिक आज बंदमुळे मोठ्या संकटात सापडली आहेत. त्यामुळे राज्य सरकारने आता बर्यापैकी लॉकडाऊन शिथिल करून सुविधा देण्यास सुरवात केली आहे. अशा परिस्थित तातडीने निर्णय घेणून राज्यातील धार्मिक स्थळे पुन्हा उघडण्यास परवानगी द्यावी. यासाठी कडक नियमावली करावी, जेणेकरून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढणार नाही, अशी मागणी अहमदनगर सोशल फाउंडेशन ट्रस्टचे व्यवस्थापक नईम सरदार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
ई-मेलद्वारे पाठवण्यात आलेल्या निवेदनात म्हणाले आहे की, यापुढील काळात आपल्याला ‘कोरोना’ बरोबरच जगायचे आहे. यासाठी स्वयंशिस्त पाळणे ही काळाची गरज आहे. धार्मिक स्थळे सुरु करण्यास शासनाने परवानगी देऊन सामाजिक अंतर व खबरदारी बाबतचे सर्व कडक नियम पाळण्याची जबाबदारी संबंधित ट्रस्टवर सोपवली तर ते कर्तव्य म्हणून ही जबाबदारी पार पाडतील, असे नमुद केले आहे.
Post a Comment