कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी पुन्हा लॉकडाऊन पुकारा


माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर- शहरासह जिल्ह्यात कोरोनाचे संक्रमण वाढत असताना या महामारीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी दोन दिवसाचा जनता कर्फ्यू व लॉकडाऊन पुकारुन, बाजारपेठा बंद करण्याची मागणी यशस्विनी महिला ब्रिगेडच्यावतीने करण्यात आली. या मागणीचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचीत यांना देण्यात आले. यावेळी यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे पाटील, रोहिणी पवार, मिनाक्षी साळवे, जया वाळेकर, रोहिणी वाघीरे आदि उपस्थित होत्या.

मागील दोन दिवसात शहरासह जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढला आहे. सदरील संक्रमण रोखण्यासाठी किमान दोन दिवसाचा जनता कर्फ्यू तर कोरोनाचे संक्रमण संपेपर्यंत लॉकडाऊन आवश्यक आहे. शहरातील बाजारपेठा चालू असल्याने गर्दीचे प्रमाण वाढू लागले आहे. यामुळे संक्रमणाचा अधिक धोका असल्याचे निवेदनात म्हंटले आहे. कोरोनाचे संसर्ग आटोक्यात येईपर्यंत बाजारपेठ बंद ठेवाव्या, किमान दोन दिवसाचा जनता कर्फ्यू व संक्रमण संपेपर्यंत लॉकडाऊन पाळावा, मुंबई, पुणे इतर ठिकाणाहून नगर जिल्ह्यात येणा-या नागरिकांवर प्रतिबंध करावे, सरकारी कार्यालय व जीवनावश्यक वस्तूच्या ठिकाणी फिजीकल डिस्टन्स ठेवण्यास सक्ती करण्याची मागणी यशस्विनी महिला ब्रिगेडच्यावतीने करण्यात आली आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post