पंकजांचे मुंबईत निवासस्थानी, खासदार प्रीतम मुंडेंचे गोपीनाथ गडावर अभिवादन
माय अहमदनगर वेब टीम
बीड - लोकनेते गोपीनाथ मुंडे यांचा ३ जून रोजी सहावा स्मृतिदिन आहे. माजी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांना लॉकडाऊनमुळे गोपीनाथगडावर येणे शक्य नाही. त्यामुळे त्या मुंबईत निवासस्थानी आहेत. बीडच्या भाजप खासदार डॉ. प्रीतम मुंडे या गोपीनाथ गडावर जाऊन मुंडे यांना अभिवादन करणार आहेत. पंकजांच्या फेसबुक अकाउंटवरून हा कार्यक्रम लाइव्ह होणार आहे. बुधवारी सकाळी ११.३० वाजता खा. प्रीतम यांचे गडावर आगमन झाल्यावर समाधी पूजन, दुपारी ११.५० वा. पंकजा यांचे कुटुंबीयांसोबत मुंबई येथे निवासस्थानी प्रतिमा पूजन आणि संवाद हे कार्यक्रम फेसबुकवर लाइव्ह होतील.
चाहत्यांना केले आवाहन...
परिवारातील सर्वांनी एकत्र यावे, उजवीकडे महिला व डाव्या बाजूला पुरुष उभे राहा..महिलांनी एक व पुरुषांनी एक असे दोन दिवे लावावेत..मुंडे साहेबांचा आवडता पदार्थ करा आणि कोरोनाच्या या परिस्थितीत एक समाजकार्य करून ते फोटो माझ्या फेसबुक, ट्विटर आणि इन्स्टाग्रामवर पाठवा ...स्वतः सुरक्षित राहा व समाजालाही सुरक्षित ठेवा, असे आवाहन पंकजा यांनी फेसबुक पोस्टद्वारे केले आहे.
Post a Comment