भोजनाचा गंध वाढवू शकतो लठ्ठपणा
माय अहमदनगर वेब टीम
हेल्थ डेस्क - अतिखादाडपणामुळे शरीराचे वजन वाढते, हे सगळ्यांनाच माहीत आहे, मात्र अन्न खाल्ल्यामुळेच वजन वाढते असे नाही, तर त्याचा सुगंधसुद्धा तुमच्या आरोग्यावर भारी ठरू शकतो. चांगल्या खाद्यपदार्थांचा दरवळही व्यक्तीची भूक वाढवतो. हा दरवळ लठ्ठपणाचे कारण बनू शकतो, असे अमेरिकेतील लॉसएंजेल्समधील सेडर्स सिनाई मेडिकसेंटरच्या शास्त्रज्ञांनी सांगितले. या शास्त्रज्ञांनी उंदरांवर केलेल्या संशोधनातून हा निष्कर्ष काढला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, समजा एखाद्या उंदराची हुंगण्याची क्षमता नष्ट केली तर जास्त भोजनही त्याच्या लठ्ठपणासाठी कारण ठरत नाही.
दुसरीकडे ज्या उंदरांची हुंगण्याची क्षमता जास्त होती, त्यांचे वजन दुप्पट वेगाने वाढते. या संशोधनात असे दिसून आले की, आपण जे खातो, त्याच्या सुगंधाचा आपल्या प्रकृतीवर मोठा परिणाम होतो. या सुगंधातूनच भोजनातून मिळणा-या कॅलरीचा आपले शरीर कसा वापर करेल, हे ठरत असते.
Post a Comment