या स्टेडियममध्ये प्रेक्षकांच्या प्रवेशावर पूर्णपणे बंदी
माय अहमदनगर वेब टीम
नवी दिल्ली - कोरोना व्हायरसमुळे क्रीडा नव्या तंत्रज्ञानाचा उपयोग वाढेल. जगात अनेक ठिकाणी खेळ सुरू झाले आहेत. मात्र स्पर्धेत चाहत्यांच्या स्टेडियममध्ये येण्यावर बंदी आहे. जोपर्यंत औषध तयार होत नाही, तोपर्यंत चाहते मोठ्या संख्येने स्टेडियममध्ये येण्यावर शंका आहे. मात्र, भारतीय क्रीडा क्षेत्र त्यासाठी अद्याप तयार नाही. टाटा कम्युनिकेशन्स व इंटरटेन्मेंटचे प्रमुख धवल पोंडाने म्हटले की, “देशात क्रीडा क्षेत्रातील हा सर्वात वाईट काळ आहे. जेव्हा खेळ पुन्हा सुरू होईल, तेव्हा तंत्रज्ञानाचा प्रभाव वेगाने वाढेल.’ त्यांच्या मते, लोक टीव्हीवर चांगल्या अनुभवासह सामने पाहतील. अशात नवे तंत्रज्ञान आणण्याची संधी आहे. अशात कंपन्या नवे अॅप आणि ३६० डिग्री व्हिडिओसारखे नवे तंत्र आणतील. आतापर्यंत प्रॉडक्शन टीममध्ये जवळपास २०० ते ३०० जण आहेत. जगभरात स्पर्धेचे प्रक्षेपण करण्यासाठी त्यांना वर्षातून २५० दिवस प्रवास करावा लागत असे. त्यात अब्जावधी रुपये खर्च होतात. पर्यावरणाचेदेखील नुकसान होते. पोंडांनी म्हटले की, आता अशा तंत्रज्ञानाचा वापर होऊ शकतो, जे एका ठिकाणी बसून प्रॉडक्शन टीमकडून व्हिडिओ सेकंदात सर्वांपर्यंत पाेहोचेल. त्यानंतर लोक टीव्ही इतर उपकरणावर सामने पाहू शकतील. भारतात क्रीडाच्या स्थानिक गोष्टींवर लक्ष दिले जाईल. प्रत्येक ठिकाणी स्थानिक भाषेत समालोचन पोहोचवण्याचा प्रयत्न केला जातो.
ग्रामीण भागात इंटरनेट सेवेची अडचण कायम:
भारतात मोठी लोकसंख्या खेड्यात राहते. त्यांना अद्याप इंटरनेट सेवेच्या अडचणीचा सामना करावा लागतोय. पोंडांनी म्हटले की, नव्या तंत्रज्ञानामुळे त्यांना पुन्हा अडचणी येतील. यातून रोजगाराची संधी निर्माण होऊ शकते. रिमोट प्रॉडक्शनमध्ये कॅमेरा प्लेसिंगसारखे तंत्र माहिती असलेली गरज पडेल.
Post a Comment