परतफेड योजनेला पुन्हा मुदतवाढ




माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर - राज्यातील पतसंस्था आणि नागरी सहकारी बँकांच्या थकीत कर्जाच्या वसुलीसाठी असलेल्या सामोपचार परतफेड योजनेला सहकार विभागाने पुन्हा एकदा 31 मार्च 2021 पर्यंत अटींसह मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे थकीत कर्जामुळे अडचणीत सापडलेल्या पतसंस्था आणि नागरी सहकारी बँकांना दिलासा मिळाला आहे. यासंदर्भात सहकार विभागाने परिपत्रक जारी केले आहे.

नागरी सहकारी पतसंस्थांना अनुत्पादक खात्यांमध्ये (एनपीए) वाढ होत असल्याने त्यासाठी तरतूद करावी लागत होती. त्यामुळे संबंधित पतसंस्थांना स्वनिधीचा वापर करावा लागत होता. परिणामी, पतसंस्थांच्या ठेवी कमी होऊन पतसंस्था अडचणीत आल्या होत्या. या पार्श्वभूमीवर सामोपचार योजनेला मुदतवाढ देण्याची मागणी करण्यात येत होती.

सहकार विभागाने या योजनेला 31 मार्च 2019 पर्यंत मुदतवाढ देण्याचा प्रस्ताव सहकार मंत्रालयाकडे पाठविला होता. या विभागाने 31 मार्च 2020 पर्यंत मुदतवाढ दिली होती. आता पुन्हा मागणी झाली. त्यामुळे अडचणीतील पतसंस्थांना दिलासा देण्यासाठी 31 मार्च 2021 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
नागरी सहकारी बँकांसाठी 31 मार्च 2018 अखेर कर्जखाती अनुत्पादक कर्जाच्या संशयित किंवा बुडीत वर्गवारीत समाविष्ट केलेली असतील अशा सर्व खात्यांना लाभ होईल.

31मार्च 2018 अखेर अनुत्पादक कर्जाच्या सब स्टॅन्डर्ड वर्गवारीत समाविष्ट झालेल्या व नंतर संशयित व बुडीत वर्गवारीत गेलेल्या कर्जखात्यांना देखील या योजनेचा लाभ होईल.

या आहेत अटी..(पतसंस्था)
अनुत्पादक कर्ज निश्चित करण्याचा(कर्ज एनपीए ठरविण्यासाठी कट ऑफ डेट) कालावधी हा 31 मार्च 2018 असा धरण्यात आला आहे.
या योजनेचा फायदा 31 मार्च 2019 पर्यंत घेता येणार आहे. तडजोडीचा व्याजदर हा 12 टक्के असेल. कर्जदार एकरकमी पैसे भरण्यास तयार असल्यास त्याला आठ टक्के दराने व्याजाची आकारणी करण्यात येईल. परतफेडीचा दर हा मूळ किमतीपेक्षा अधिक नसेल
या योजनेंतर्गत अर्ज करण्याची शेवटची तारीख 31मार्च 2021 राहील. सदर योजनेंतर्गत प्राप्त अर्जावर संचालक मंडळाने 31 मार्च 2021 अखेर निर्णय घेणे आवश्यक राहील.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post