यांनी केली हिवरे बाजारची पाहणी



माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर – नामदार शंकरराव गडाख मंत्री जलसंधारण महाराष्ट्र राज्य यांनी दि.२० जून २०२० रोजी आदर्शगाव हिवरे बाजारला भेट देऊन जलसंधारण तसेच विविध विकास कामाची पाहणी केली तसेच आदर्श गाव योजनेची आढावा बैठक घेतली.

पद्मश्री पोपटराव पवार यांनी नामदार गडाख यांचे स्वागत केले.नामदार गडाख यांनी आदर्श गाव हिवरे बाजार येथील वनक्षेत्राची ,सिमेंट बंधारा यांची पाहणी केली.तसेच लॉकडाऊन कालावधीत झालेल्या जमीन सपाटीकरण कामाला व यशवंतराव चव्हाण एकात्मिक ग्रामीण विकास प्रशिक्षण केंद्र इमारत कामाला भेट दिली.

आदर्श गाव संकल्प व प्रकल्प समिती आढावा बैठकीत गावांचा सर्वांगीण व सर्वकष विकास ,गाव निवडीचे निकष ,सध्या सक्रीय असलेली गावे,योजनेतून करावयाची कामे अशा विविध मुद्यांवर बैठकीत सविस्तर चर्चा झाली.

यावेळी बोलताना नामदार गडाख म्हणाले की या गावात विविध विकास कामे झाली आहेत याचे मोठे श्रेय पद्मश्री पोपटराव पवार यांचे असून त्यांचे काम राज्यालाच नव्हे तर संपूर्ण देशाला परिचित झाले आहे.ग्रामीण भागात काम करणारया माणसाने पवार यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवला पाहिजे.आदर्श गाव योजनेत समाविष्ट असलेली गावासाठी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली कामे चालू असून यापुढेही शासन खंबीरपणे या गावांच्या मागे उभे राहील.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post