दारूची वाहतूक करणारी वाहने पकडली



माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर – बेकायदेशीररित्या विदेशी दारू कब्जात बाळगुन दोन वाहनातुन वाहतूक करणार्‍या दोघांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी सापळा रचुन शिताफीने पकडले. त्याच्याकडील 5 लाख 41 हजार 920 रूपयांची दारू, पिकअप व्हॅन व महिंद्रा जीप असा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई नेप्ती नाका चौक, नालेगाव येथे बुधवारी (दि.17) करण्यात आली.

कल्याण रोडने भाळवणीकडुन नगरकडे एक पिकअप व्हॅन (क्र. एम एच 16 ए ई 1181) मधुन विदेशी दारूचे बॉक्स भरून येत आहे. त्या व्हॅनच्या पुढे स्कार्पिओ जीप (क्र. एम एच 16 बी एच 1919) मधुन दारूचा मालक येत आहे, आता लगेच नेप्ती नाका, नालेगाव येथे सापळा लावल्यास मिळुन येतील, अशी माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांना मिळाली. मिळालेल्या माहितीची खात्री करून पोलिसांनी नेप्ती नाका येथे सापळा रचुन माहिती मिळाल्याच्या वर्णनाची वाहने अडवली. दोन्ही वाहन चालकांना ताब्यात घेतले. त्यांची चौकशी केली असता त्यांची नाव नरेंद्र राजेंद्रसिंग रौतेला (वय-40, रा. प्रेमनगर, देहराडुन), बबन भाऊसाहेब काकडे (वय-35, रा. गोरेगाव, ता. पारनेर) असल्याचे सांगितले. पोलिसांनी वाहनाची झडती घेतली असता पिकअप व्हॅनमध्ये 5 लाख 41 हजार 920 रूपयांची विदेशी दारूचे 77 बॉक्स आणि 2 हजार 900 रूपये असा माल आढळुन आला. पोलिसांनी विदेशी दारू व रोख रकमेसह 7 लाख रूपये किंमतीचा पिकअप व्हॅन व 3 लाख रूपयांची जीप असा 15 लाख 44 हजार 820 रूपयांचा मुद्देमाल जप्त केला.

या प्रकरणी पो.कॉ. कमलेश पाथरूट यांच्या फिर्यादीवरून तोफखाना पोलिसांनी महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम 65 (अ)(ई) प्रमाणे गुन्ह्याची नोंद केली. पुढील कारवाई तोफखाना पोलिस करीत आहेत. ही कारवाई पो.नि. दिलीप पवार यांच्या पथकातील पो.ना. रवींद्र कर्डिले, पो.कॉ. रणजित जाधव, शिवाजी ढाकणे, सागर सुलाखे, कमलेश पाथरूट यांनी केली आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post