तोंडाला मास्क न लावल्यानं दुकानदाराला चोपलं
माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर - ‘तोंडाला मास्क लावा, मगच दुकानात या,’ असं म्हणाल्याचा राग आल्यानं दुकानदार आणि ग्राहकामध्ये वाद झाला. मास्क न लावता दुकानात प्रवेश करणाऱ्या ग्राहकानं दुकानात काउंटरवर ठेवलेल्या वस्तू तोडल्या. श्रीरामपूर येथे हा प्रकार घडला. या प्रकरणी काल, सोमवारी शाबाद जावेद शेख (रा. श्रीरामपूर) याच्याविरोधात श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
करोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या जात आहेत. नागरिकांनी घराच्या बाहेर पडताना तोंडाला मास्क लावणे सक्तीचे करण्यात आले आहे. सार्वजनिक ठिकाणी मास्क न लावणाऱ्यांना दंडही आकारला जात आहे. सरकारी, खासगी कार्यालयांसह दुकानांमध्येही तोंडाला मास्क नसेल तर प्रवेश दिला जात नाही. मात्र, श्रीरामपूर येथे एका दुकानदारानं ग्राहकाला तोंडाला मास्क लावण्यास सांगितल्यामुळं संबंधित ग्राहक व दुकानदार यांच्यात वाद झाला. त्यानंतर ग्राहकानं दुकानातील कामगारांना थेट जीवे मारण्याची धमकीच दिली.
श्रीरामपूर येथे शिवाजी चौक येथे क्रॉकरी दुकान आहे. या दुकानात शाबाद शेख हा ग्लास घेण्यासाठी गेला होता. यावेळी त्यानं तोंडाला मास्क लावला नव्हता. त्यामुळे दुकानदारानं त्याला, ‘आधी मास्क लावा मग मी ग्लास देतो,’ असं सांगितलं. मात्र, त्याचा राग आल्यानं शेख यानं दुकानात घुसून काउंटरवर ठेवलेल्या साहित्याची तोडफोड करीत नुकसान केलं. तसंच दुकानातील कामगारांना जीवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी गुन्हा दाखल झाला असून, पुढील तपास पोलिसांनी सुरू केला आहे.
Post a Comment