घरफोडीत लॅपटॉपसह दिड लाखांची चोरी
माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर – उघड्या घराच्या दरवाजातुन आत प्रवेश करून अज्ञात चोरांनी घरातील 1 लाख 53 हजारांचा ऐवज चोरून नेला. ही घटना साई निवास, मोतीबाग, केडगाव येथे बुधवारी (दि.17) पहाटेच्या सुमारास घडली.
गजानन अनिल भोसले (वय 32, रा. पवई, हल्ली रा. साईनिवास, मोतीबाग, केडगाव) हे घराचा दरवाजा उघडा ठेवून कुटुंबासह झोपलेले असताना पहाटेच्या सुमारास भोसले यांच्या घराचे दरवाजातुन प्रवेश करून अज्ञात चोराने घरातील सामानाची उचकापाचक करून 80 हजारांचा लॅपटॉप, 50 हजारांचा लॅपटॉप, 10 हजारांचा मोबाईल, 8 हजारांचा मोबाईल, 5 हजार रूपये रोख व इतर कागदपत्रे असा ऐवज चोरून नेला.
या प्रकरणी गजानन भोसले यांच्या फिर्यादीवरून कोतवाली पोलिसांनी भारतीय दंड विधान कलम 457, 380 प्रमाणे घरफोडीच्या गुन्ह्याची नोंद केली आहे.
Post a Comment