...म्हणून सोन्याच्या मागणीत वाढ होण्याची शक्यता


माय अहमदनगर वेब टीम
नवी दिल्ली - अनलॉक-१.० नंतर देशात सराफा दुकाने आणि शोरूम हळूहळू उघडू लागली आहेत. मात्र, सप्टेंबर महिन्याआधी देशात सोन्याची मागणी खूप जास्त होण्याची शक्यता नाही. सोन्याच्या वाढत्या किमती आणि आर्थिक मंदीच्या भीतीने सध्या खरेदीदार सोन्याच्या खरेदीपासून दूर राहतील.

जगातील दुसरा मोठा सोन्याची विक्री होणाऱ्या देशात महाग भाव आणि आर्थिक विकास दरातील घसरणीमुळे पहिल्या तिमाहीत सोन्याची मागणी आधीच कमी झाली होती. २५ मार्चपासून लागू दोन महिन्यांच्या टाळेबंदीमुळे सोन्याची विक्री आणखी खाली पोहोचली आहे. ऑल इंडिया जेम्स अँड ज्वेलरी डोमेस्टिक काैन्सिलचे उपाध्यक्ष शंकर सेन यांच्यानुसार, १ जूनपासून अनलॉक-१ सुरू झाल्यानंतर सराफा बाजारपेठ सुरू होऊ लागली आहे, मात्र, ग्राहकांनी अद्यापही अंतर राखले आहे. लोकांचे लक्ष सध्या आपला व्यवसाय व नोकरीवर आहे. ज्यांनी आधीच ऑर्डर दिली होती किंवा टाळेबंदीवेळी ऑनलाइन खरेदी केलेले लोक सध्या दागिने घेत आहेत. वाहतूक सुरू न झाल्यामुळेही ग्राहकांची संख्या कमी हाेत आहे. सेन म्हणाले, जून महिन्यातही विक्री खूप कमी होण्याची शक्यता आहे.

सोन्याची मागणी आणि खरेदी सप्टेंबरआधी होणार नाही. त्यांनी सांगितले, सणासुदीत होणारी दागिन्यांची खरेदीही लोकांनी टाळली आहे. विवाहानिमित्त होणाऱ्या खरेदीतही विलंब होत आहे. केअर रेटिंग्ज लिमिटेडनुसार, टाळेबंदीमुळे यंदा अक्षय्य तृतीयानिमित्त सोन्याची नाममात्र विक्री झाली. पाडवाही सोने खरेदीसाठी शुभ मानला जातो. सोन्याच्या वाढत्या किमती, आर्थिक मरगळीमुळे लोकांच्या क्रयशक्तीत आलेल्या घसरणीमुळे नजीकच्या भविष्यात जेम्स अँड ज्वेलरी व्यवसायाला दिलासा मिळण्याची शक्यता नाही.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post